36 सेकंदात 20 लाख लंपास; व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था
Tuesday, 29 September 2020

एका अल्पवयीन मुलाने बॅंकेमधून 36 सेकंदात 20 लाख रुपये लंपास केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलासह त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.

चंदीगड (हरियाणा): एका अल्पवयीन मुलाने बॅंकेमधून 36 सेकंदात 20 लाख रुपये लंपास केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलासह त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.

Video: कुत्र्याच्या पिल्लाचे घरात अनोखे स्वागत!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणा येथील जिंद जिल्ह्यात पीएनबी बँकेची शाखा आहे. बँकेमध्ये नागरिकांची गर्दी होती. रोखपाल सत्यवान यांनी 20 लाख रुपयांचे पाच बंडल आल्या टेबलवर ठेवले होते. काही वेळासाठी ते बाजूच्या टेबलवर गेले. तेवढ्यात 11 वर्षाच्या मुलाने त्यांच्या केबीनजवळ जात पैशांचे बंडल पिशवीत भरले आणि सोबत असलेल्या जोडीदारासह बाहेर पडला. केवळ 36 सेंकदात ही घटना घडली. रोखपालाने संध्याकाळी पैशांचा हिशोब सुरू केला तेंव्हा 20 लाख रुपये कमी पडले. यामुळे ते घाबरून गेले. बँकेच्या कर्मचार्‍यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक अकरा वर्षाचा मुलाने ही चोरी केल्याचे आढळले.

Video: मोटार चालवत असताना साप लागला डुलायला

दरम्यान, रोखपालाने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर आणि सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर तपास सुरू केला. अल्पवयीन मुलासह त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: child stole rs 20 lakh from pnb bank in jind video viral

Tags
टॉपिकस
Topic Tags: