चीनच्या कुरापती सुरूच; आता या भागात वाढविले येथे सैन्य !

China attempts to open new front in Ladakhs Depsang
China attempts to open new front in Ladakhs Depsang

लेह (लडाख) : भारताविरोधातील चीनच्या कुरापती या थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीत. गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीत सपाटून मार खाल्ल्यानंतर चीनने लडाखमधील डेपसांग येथे सैन्य वाढविल्याचे समोर आले आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीकडून भारतासाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या दौलत बेग ओल्डी आणि डेपसांग या भागात मोर्चा उघडण्यात येत आहे. डेपसांग परिसरासोबतच चीनने दौलत बेग परिसरात चिनी सैन्याकडून जमवाजमव सुरू झाली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

चीन डेपसांग भागात जमवाजमव करू शकतो, याची कुणकुण भारताला मेच्या अखेरीसच लागली होती. तेव्हापासून या भागातील लष्कराची उपस्थिची भक्कम करण्यात आली होती. डेपसांग भागाताच चिनी सैन्याने २०१३ मध्ये पहिल्यांदा घुसखोरी केली होती. एकीकडे सीमेवर सैन्य आमनेसामने येत असताना दुसरीकडे दोन्ही देशांमध्ये विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे. सैनिकी स्तरावरील चर्चा झाल्यानंतर दोन्ही देशामध्ये राजनयिक स्तरावरील चर्चा होणार आहे. दोन्ही देशांचे संयुक्त सचिव आज चर्चा करण्याची शक्यता आहे.
---------
डॉ. कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश, कोरोना चाचण्यांची संख्या वाढणार
---------
पाकिस्तानवर मोठी नामुष्की; 'या' यादीतील नाव कायम
---------
दरम्यान, सीमेवर सज्ज असलेल्या भारतीय लष्कराने गलवानमध्ये घुसखोरी करण्याचे प्रयत्न हाणून पाडले होते. चीनने लडाख आणि अक्साई चीन भागात सामरिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या भारतीय भूभागांच्या दिशेने आपला मोर्चा वळवण्याची तयारी सुरू केल्याचे दिसून येत असून डेपसांगमध्ये सैन्याची जमवाजमव करणे हा त्याचाच भाग असल्याचे दिसत आहे. पूर्व लडाखमधील काही नव्या भागात चीनच्या बाजूने जमवाजमव सुरू झाली असून, त्यामुळे 

जून महिन्यामध्ये चीनच्या तळाजवळ कॅम्प आणि वाहनांची वर्दळ दिसून आली आहे. चीनने हा तळ २०१६ पूर्वीच बनवला होता. मात्र आता तिथे नवे बांधकाम तसेच वाहनांसाठी रस्ता तयार करण्यात आल्याचे दिसत आहे. तसेच जमिनीवरील ट्रॅकिंगमधून याला दुजोराही मिळाला आहे.

टी-९० टँक उपस्थिती मोठ्या प्रमाणावर
लडाखमध्ये असलेल्या मोकळ्या मैदानात टँकसाठी चांगली संधी असते. पूर्व लडाखच्या स्पांगुर गॅपपासून सरळ चीनी आतमध्ये जाऊ शकतात. याशिवाय डेमचोकच्या भागात एक इंडल व्हॅली म्हणून आहे. येथिल सुरक्षेची जिम्मेदारीही टँक सांभाळत असतात. या दोन्ही भागात मोकळी मैदाने आहेत. त्यामुळे टँकची या भागात महत्वपुर्ण भूमिका राहत असल्याने चीनने तिथे मोठ्या प्रमाणावर टँक वाढवले असल्याचे बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com