लडाखमध्ये भारताची ३८ हजार चौरस किलोमीटर जमीन चीनने बळकावली ; राजनाथ सिंह

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 September 2020

सीमा प्रश्न एक महत्वाचा मुद्दा असून हा मुद्दा भारत आणि चीन दोघांनी औपचारिकरित्या मान्य केले आहे.

नवी दिल्ली - गेल्या पाच ते सहा महिन्यापासून सीमा वारून भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातवरण आहे. चीनच्या घुसखोरीला भारतीय जवान सडेतोड उत्तर देत आहेत. तरीही चीन आपली आगळीक थांबविण्याचे नाव घेत नाही. सध्या पूर्व लडाख सीमेवर चीन आणि भारताचे संबंध ताणल्यामुळे तेथेही तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेत महत्त्वाची माहिती दिली आहे. 

लडाखमधील भारताची ३८ हजार चौरस किलोमीटर जमीन अनधिकृतपणे चीनने बळकावलीची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९६३ ला झालेल्या तत्कालीन सीमा करारांतर्गत पाकिस्तानने POK मधील ५,१८० स्क्वेअर किलोमीटरचा भूभाग बेकायदरित्या चीनकडे सोपवला आहे. 

राजनाथ सिंह म्हणाले, सरकारच्या वेगवेगळ्या गुप्त यंत्रणांदरम्यान समन्व आणि वेळ परीक्षण तंत्र असून यामध्ये केंद्रीय पोलिस दल आणि तिन्ही सशस्र दलांच्या गुप्त यंत्रणांचाही समावेश आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मी लडाख दौरा करून तेथील जवानांचे मनोधर्य उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नुकताच लडाख दौरा करून भारतीय जवानांची भेट घेतली आणि समस्त देशवासी आपल्या वीर जवानांसोबत उभे आहेत, हा त्यांना संदेशही दिला. सीमा प्रश्न एक महत्वाचा मुद्दा असून हा मुद्दा भारत आणि चीन दोघांनी औपचारिकरित्या मान्य केले आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी संयमाची आवश्यकता आहे. शिवाय शांततापूर्ण चर्चेच्या माध्यमातूनच या मुद्याचे निष्पक्ष, परस्पर सहमतीने समाधान निघू शकते. 

हे पण वाचा -  इंग्लंडमधील वृत्तपत्रांनी दखल घेतलेले कोल्हापुरचे माजी कसोटीपटू एस. आर. पाटील यांचे निधन 

१९९३ आणि १९९६ मध्ये झालेल्या कराराबाबत माहिती देताना राजनाथ सिंह म्हणाले म्हणाले, LAC जवळ दोन्ही देशांच्या सैन्याची संख्या कमी असावी. शिवाय सीमा प्रश्नी    तोडगा निघत नाही, तो पर्यंत LAC चा आदर ठेवायचा, उल्लंघन करायचे नाही असेही या करारात म्हटले आहे. एप्रिल महिन्यापासून पूर्व लडाखच्या सीमेवर चीनकडून सैनिकांच्या आणि युद्ध सामग्रीच्या संख्येत वाढ करण्यात आल्याची निरीक्षणे आहेत. १५ जून रोजी चीनविरुद्ध गलवानमध्ये रक्तरंजित संघर्षात आपल्या जवानांनी बलिदान देले. यात चीनचेही मोठे नुकसान झाले आहे. २९-३० ऑगस्ट रोजी पॅन्गाँग सरोवरच्या दक्षिण भागात यथास्थिती बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारतीय सेनेने त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. द्विपक्षीय संबंधाचा चीनकडून अनादर झाल्याचे यातून स्पष्टपणे दिसत आहे. 

हे पण वाचाहोणार होता पीएसआय पण झाला गजाआड

 संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China in illegal occupation of 38 000 sq km of Indian land say Rajnath Singh