
लडाखमध्ये भारतीय सैनिकांच्या विरोधाचा सामना करत असलेल्या चीनने आता तिबेटींना भारतासोबत लढण्यासाठी प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे. चीनच्या अधिकाऱ्यांकडून तिबेटी मुलांना विशेष शिबिरात पाठवलं जात आहे. या मुलांना चीनच्या नजरेतून जगाबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न यातून केला जाणार आहे. चीन या मुलांना शस्त्रास्त्रांचे मुलभूत प्रशिक्षण देत आहे. त्यांना मिलिशियात समाविष्ट करता येण्यासाठी त्यांचा खटाटोप सुरु आहे. लडाखमध्ये एका बाजुला चीनचे सैनिक कडाक्याच्या थंडीचा सामना करण्यात असमर्थ ठरत असताना तिबेटी मुलांना प्रशिक्षण देण्यात चीन गुंग आहे. (China giving training to Tibetan children)
हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, शिबिरांमध्ये अनेक मुलं ही किशोरवयीन आहेत. मात्र भारतीय सुरक्षा संस्थांच्या माहितीनुसार, असंही म्हटलं जात आहे की, या शिबिरांमध्ये ८ ते ९ वर्षांच्या मुलांनासुद्धा पाठवण्यात येत आहे. शिबिरांमध्ये मुलांच्या मनात असं काही भरवलं जात आहे की ज्यामुळे स्थानिक लोक तिबेटींना भरती करण्याला विरोध करणार नाहीत. याआधी डिसेंबरमध्येच तिबेटी अॅक्शन इन्स्टिट्यूटने एक रिपोर्ट दिला होता. त्यात चिनी अधिकाऱ्यांनी तिबेटमध्ये बोर्डिंग स्कूलचं मोठं नेटवर्क तयार केलं, तिथल्या मुलांना त्यांच्या आई वडिलांपासून दूर करण्यासाठीचा तो प्लॅन होता.(Chinese authorities set up a large network of boarding schools in Tibet)
तिबेटमधील ९ लाख मुलं सरकारी शाळांमध्ये शिकत आहेत. त्यांना तिबेटी भाषा आणि संस्कृतीपासून दूर केलं जाईल असं रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे. या ९ लाख मुलांचे वय ६ ते १८ वर्षे यादरम्यान आहे. त्यांच्यावर चिनी नागरिकांप्रमाणे संस्कार केले जात आहेत. ज्यामुळे ती मुलं चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे एकनिष्ठ बनतील. मुलांना कुटुंबापासून दूर केलं असून चिनी भाषा शिकवली जात आहे. मुलांना स्वत:चा धर्मही मानण्यास बंदी घालण्यात येतेय.(Children are also banned from practicing their own religion)
भारतीय सुरक्षा संस्थांचे म्हणणे आहे की, या शिबिरांमध्ये मुलांना तिबेटी बौद्ध संस्कृतीबद्दल मनात द्वेष निर्माण केला जात आहे. त्यांना एक सैनिक म्हणून तयार केलं जात आहे. चिनच्या न्यिंगत्रीमध्ये लष्करी प्रशिक्षण शिबिर स्थापन करण्यात आलं आहे. हा भाग भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्याला लागून आहे. याला दक्षिण तिबेट असंही म्हटलं जात आहे. मानलं जात आहे की, चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या इशाऱ्यानुसार लष्करी प्रशिक्षण शिबिर तयार केलं जात आहे. चिनी माध्यमांनुसार लष्करी प्रशिक्षणाची शिबिरं २०२१ च्या सुरुवातीला उभारण्यात आली.चिनी लष्कराने शिबिर अशा पद्धतीने सुरु केलं आहे की, तिबेटी तरुणांना शाळेच्या सुट्टीवेळी प्रशिक्षण दिलं जात आहे. तिबेटींवर नजर ठेवणारी वेबसाइट फ्री तिबेटनुसार, शिबिरं अशा जागी सुरु आहेत जिथं मोठ्या प्रमाणावर लष्कर तैनात आहे. तर दुसरीकडे चिनी माध्यमांचा असा दावा आहे की, या केंद्रांची निर्मिती तिबेटी तरुणांना राष्ट्रीय संरक्षणाचे शिक्षण देणं ही आहे. त्यामुळे त्यांच्यात चीनबद्दल प्रेम आणि देशभक्ती निर्माण व्हावी. ते आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करू शकतील.(Chinese military has started the camp in such a way that Tibetan youth are being trained during the school holidays)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.