
China Spy Ships: भारत-पाकिस्तान या दोन्ही शेजारील देशांमधील संघर्ष अद्याप कायम असतानाच आता एक नवी घटना समोर आली आहे. चीनचं हेरगिरी करणारं जहाज भारताच्या समुद्री हद्दीत आढळल्यानं खळबळ उडाली आहे. चीनच्या जहाजांच्या या फ्लीटमध्ये एकूण चार जहाज आहेत. यांपैकी तीन जहाजं अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मोक्या ठिकाणी तैनात झाल्या आहेत. जहाजांची ही फ्लीट संशोधन करणारी असल्याचं सांगितलं जात असलं तरी ही जहाजं हेरगिरी जहाजं असल्याची चर्चा सुरु आहे. टाइम्स नाऊनं याबाबत वृत्त दिलं आहे.