esakal | LAC वर डिएस्कलेशनसाठी चीनची कुटील मागणी; भारताने दिला स्पष्ट नकार
sakal

बोलून बातमी शोधा

Indo China

भारतीय आणि चीनी सैन्य सध्या फिंगर 4 वर 5800 मीटरच्या उंचीवर आहेत.

LAC वर डिएस्कलेशनसाठी चीनची कुटील मागणी; भारताने दिला स्पष्ट नकार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील एलएसी अर्थात वास्तविक नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनच्या दरम्यान तणावाची परिस्थिती अद्याप कायम आहे. गेल्या 9 महिन्यांपासून याबाबत हालचाली सुरु आहेत. चर्चेतून मार्ग काढण्याचे प्रयत्न देखील लष्करी पातळीवर होत आहेत. याबाबत 7 वेळा भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये बैठका पार पडल्या असल्या तरीही ठोस असा निर्णय झालेला नाहीये. आठवी बैठक कधी  होईल याची निश्चित अशी तारीख अद्याप ठरलेली नाहीये. यादरम्यानच अशी बातमी आहे की, भारताने चीनचा एक प्रस्ताव धुडकावून लावला आहे. या प्रस्तावात म्हटलं होतं की, पीपल्स लिबरेशन आर्मी म्हणजे पीएलएचे जवान पँगाँग त्सोच्या उत्तर किनाऱ्यावरील डोंगराळ भागात फिंगर 4 मधील चीनी सैनिक परत जातील. 

हेही वाचा - कुलगाममध्ये दहशतवाद्यांकडून तीन भाजप कार्यकर्त्यांची हत्या; PM मोदींनी नोंदवला निषेध

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, या साऱ्या घडामोडींशी निगडीत अधिकाऱ्यांनी सांगितलंय की, पुढील बैठक 19 व्या सीपीसी केंद्रीय समितीच्या 5 व्या प्लेनरी सेशन आणि 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर होईल. भारताचे सुरक्षा मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या  बाजूने हा स्पष्ट संदेश दिला आहे की, देश डिसएंगेजमेंट आणि डी-एस्कलेशनचा संवाद तसाच सुरु ठेवण्यासाठी तयार आहे जेणेकरुन मे 2020  पासून तैनात असलेले दोन्ही बाजूचे सैन्य परतू शकेल. दोन्ही पक्षांच्या दरम्यान झालेल्या बातचितीमध्ये वरिष्ठ सैन्य कमांडरांच्या म्हणण्यानुसार, पीएलएची अपेक्षा आहे की भारतीय सैन्य केवळ पँगाँग त्सो च्या फिंगर 3 पर्यंतच तैनात असायला हवे. चीनचे सैन्य केवळ फिंगर 5 पर्यंतच तैनात राहील. याचा अर्थ असा झाला की वादग्रस्त असलेला फिंगर 4 चा चीनचा भाग बनेल जे भारताला अमान्य आहे. 

हेही वाचा - भाजपचं कँपेनिंग केलेली व्यक्ती फेसबुकची नवी पॉलिसी हेड?

चीनच्या  प्रस्तावाचा अर्थ असा आहे की, फिंगर 4 दोन्ही सैन्याच्या सीमांतून बाहेर होईल. भलेही भारतीय सैन्य याआधी फिंगर 8 पर्यंत तैनात राहत होती. चीनच्या म्हणण्यानुसार, LAC पँगाँग त्सो सरोवराच्या फिंगर 4 मधून जाते. भारताने या म्हणण्याला नकार दिला आहे. भारताचं असं म्हणणं आहे की, LAC ची रेषा फिंगर 8 मधून जाते. पीएलएने फिंगर 8 पासून फिंगर 4 पर्यंत रस्ता बनवला आहे. तर भारतीय बाजूकडून अद्याप रस्त्याने फिंगर 4 ला जोडणे बाकी आहे. भारतीय आणि चीनी सैन्य सध्या फिंगर 4 वर 5800 मीटरच्या उंचीवर आहेत. चीनचे म्हणणे आहे की, भारतीय सैन्य या प्रदेशातून कायमचे निघून जावे. 5 आणि 6 मेच्या रात्री, पीएलएने फिंगर 4 वर हल्ला केला होता.

loading image
go to top