esakal | भाजपचं कँपेनिंग केलेली व्यक्ती फेसबुकची नवी पॉलिसी हेड?
sakal

बोलून बातमी शोधा

shivnath thukral

द्वेषमूलक भाषणांबाबत नियमांवरून वादविवाद सुरू झाला होता. त्यावर फेसबुककडून म्हणावी तशी हालचाल झाली नाही. त्यानंतर आरोप झालेल्या अंखी दास यांनी राजीनामा दिला आहे.

भाजपचं कँपेनिंग केलेली व्यक्ती फेसबुकची नवी पॉलिसी हेड?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - फेसबुक इंडियाच्या पॉलिसी हेड अंखी दास यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता नवीन पॉलिसी हेड म्हणून शिवनाथ ठुकराल यांची नियुक्ती करण्यात आल्याचं वृत्त टाइम मॅगेझिनने दिलं आहे. फेसबुककडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही मात्र या नियुक्तीवरून वाद होण्याची शक्यता आहे. अंखी दास यांच्यावर पक्षपातीपणा केल्याचा आरोप गेल्या काही काळात झाला होता. अंखी दास यांनी राजीनामा देण्याचा आणि आरोपांचा काही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, आता नव्या पॉलिसी हेडच्या नियुक्तीवरूनही पुन्हा चर्चा रंगली आहे. शिवनाथ ठुकराल हे याआधी व्हॉटसअॅपच्या पॉलिसी डेडची जबाबदारी सांभाळत होते. 

द्वेषमूलक भाषणांबाबत नियमांवरून वादविवाद सुरू झाला होता. त्यावर फेसबुककडून म्हणावी तशी हालचाल झाली नाही. त्यानंतर आरोप झालेल्या अंखी दास राजीनामा देतील असं म्हटलं जात होतं आणि त्यावर ऑक्टोबर अखेरीस शिक्कामोर्तब झालं. दास यांच्यानंतर ठुकराल यांच्याकडे फेसबूक इंडियाच्या पॉलिसी प्रमुखाची जबाबदारी देण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

हे वाचा - इंटरनेटच्या मायाजालात गुरफटले जग

शिवनाथ ठुकराल याआधीही फेसबुकमध्ये होते. त्यांनी 2017 पासून मार्च 2020 पर्यंत फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉटसअॅपसाठी भारत आणि दक्षिण आशियात पब्लिक पॉलिसी डायरेक्टर म्हणून काम पाहिलं. ठकराल हे तेव्हा थेट दास यांनाच रिपोर्ट करत होते. यामध्ये ठकराल यांचे काम सरकारसोबत मिळून कंपनीच्या हिताचे डील करणे आणि लॉबिंग करणे हे होते. 

एकीकडे भाजपधार्जिण्या भूमिकेवरून अंखी दास यांच्यावर आरोप झाले असताना ठकराल यांची स्थिती काही वेगळी नाही. जवळपास 14 वर्षे पत्रकारीता केलेल्या ठकराल यांचेही भाजपशी नाते आहे. याबाबत टाइमने दिलेल्या वृत्तानुसार ठकराल हे 2014 च्या लोकसभा निवडणुकी आदी जवळपास एक वर्ष भाजपसाठी डिजिटल कँपेनिंग करत होते. 

हे वाचा - पाकच्या संसदेत मोदी नामाचा घोष

फेसबुक इंडियाची भूमिका संशयास्पद असल्याच्या रिपोर्टनंतर मोठा गदारोळ माजला होता. राजकीय पोस्ट्सबाबत पक्षपात केल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर दास यांच्या टीका केली जात होती. याप्रकरणी संसदीय समितीसमोर फेसबुकला हजर रहावं लागलं होतं. अंखी दास यांनी हेट स्पीच असलेल्या पोस्ट्स हटवत असताना भाजप नेत्यांच्या पोस्टकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला होता. रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यानंतर फेसबुकने काही पोस्ट हटवल्या होत्या.

loading image