भारतीयांची हक्काची बाजारपेठ गेली; 'चीनी राइस'चा शिरकाव

वृत्तसंस्था
रविवार, 5 जानेवारी 2020

जगातील सर्वांत मोठा तांदूळ निर्यातदार देश असा बहुमान मिरविणाऱ्या भारतासमोर चीनने मोठे आव्हान निर्माण केले आहे.

नवी दिल्ली - तांदळाची आयात करणारा देशच आता निर्यातदार झाल्यामुळे जागतिक बाजारपेठेत भारताला नवा स्पर्धक निर्माण झाला आहे. जगातील सर्वांत मोठा तांदूळ निर्यातदार देश असा बहुमान मिरविणाऱ्या भारतासमोर चीनने मोठे आव्हान निर्माण केले आहे.

आफ्रिकेतील तांदळाच्या बाजारपेठेतील भारताचा दबदबा मोडून काढत चीनने पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीतील ‘उद्योग भवना’तील धोरणकर्त्यांपासून ते तांदळाची निर्यात करणाऱ्या बड्या मिल मालकांपर्यंत सर्वांचेच धाबे दणाणले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनने आपल्याकडील तांदळाची निर्यात करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा पहिला फटका भारताला बसण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, अशी प्रतिक्रिया केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील निर्यात विभागातील (कृषी) वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

चीनमध्ये नव्या तांदळाला अधिक पसंती
सामान्यतः चिनी नागरिक नव्या तांदळाला त्याच्या चवीमुळे अधिक पसंती देतात. त्यामुळे चीनमध्ये कायम नव्या तांदळाला मागणी असते. परिणामी, नवा तांदूळ ज्या वेळी बाजारात मोठ्या प्रमाणात येतो, तेव्हा चीन सरकारी गोदामांमधील जुना तांदूळ अतिशय कमी दराने बाजारात आणतो. हा जुना तांदूळ चीनकडून आफ्रिकेला पाठविला जातो. भारत सर्वांत मोठा तांदूळ निर्यातदार आहे. चीनच्या या उद्योगांचा पहिला फटका जागतिक बाजारपेठेबरोबरच भारताला बसतो आहे, अशी माहिती ‘अपेडा’तील सूत्रांनी दिली.

भाजप नेते म्हणतात, देशात राहायचे असेल तर आमचे ऐकावेच लागेल 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chinese rice