Sri Lanka : हेरगिरी करणारी चीनची युद्धनौका श्रीलंकेच्या बंदरावर दाखल

हेरगिरी करण्यास सक्षम असलेली चीनची आणखी एक युद्धनौका श्रीलंकेतील कोलंबो येथील बंदरावर येऊन थांबली आहे.
chinese spy ship dock sri lanka port india objection colombo
chinese spy ship dock sri lanka port india objection colombosakal

कोलंबो : हेरगिरी करण्यास सक्षम असलेली चीनची आणखी एक युद्धनौका श्रीलंकेतील कोलंबो येथील बंदरावर येऊन थांबली आहे. वर्षभरापूर्वी देखील चीनची हेरगिरी करणारी युद्धनौका श्रीलंकेतील कोलंबो येथील बंदरात आली होती. यावर भारताच्यावतीने तीव्र आक्षेप नोंदविण्यात आला आहे.

‘चायनीज पीपल्स लिबरेशन आर्मी’ची ही युद्ध नौका गुरुवारी कोलंबो येथील बंदरावर येऊन थांबली.‘हाई यांग २४ आयो’ असे या युद्धनौकेचे नाव आहे. १२९ मीटर लांब असलेल्या या युद्धनौकेवर कमांडर जिन झिन यांच्या नेतृत्वाखाली १३८ कर्मचारी आहेत. ही युद्धनौका शनिवारी चीनकडे रवाना होणार असल्याची माहिती श्रीलंकेच्या नौदलाच्यावतीने देण्यात आली.

भारताच्या आक्षेपामुळे उशीर

हेरगिरी करण्यास सक्षम असलेली चीनची ‘हाई यांग २४ आयो’ युद्धनौका श्रीलंकेतील बंदरावर थांबू देण्यास भारताच्या वतीने आक्षेप नोंदविण्यात आल्याने या नौकेला येथील बंदरावर येण्यास उशीर झाल्याचा दावा एका वृत्तपत्राने केला आहे. या हेरगिरी करणाऱ्या नौकेमुळे भारताच्या संरक्षण यंत्रणांना धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

त्यामुळेच चीनच्या नौदलाने येथील बंदरावर नौका थांबविण्याबाबत परवानगी मागून देखील श्रीलंकेच्यावतीने त्यांना तत्काळ परवानगी देण्यात आली नाही. श्रीलंकेच्या नौदलाने भारतीय नौदलाला याबाबत सर्व विस्तृत माहिती दिल्यानंतरही भारताने या युद्धनौकेला श्रीलंकेत थांबू दिल्याबद्दल नापसंती दर्शवली आहे.न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com