
जर विद्यमान मुख्यमंत्री चुकून पुन्हा निवडून आले तर हा राज्याचा पराभव असेल
पाटणा : बिहार विधानसभेच्या निवडणुका आता अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. अशातच प्रचाराला रंग चढला असून प्रचाराने उंचीही गाठली आहे. आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला आता वाढला आहे. लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी आज बुधवारी बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की, जर नितीश कुमार चुकून येत्या निवडणुकीत पुन्हा निवडून आले तर राज्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर जाईल. आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
हेही वाचा - वाढत्या 'लव्ह जिहाद'वर कोश्यारींशी चर्चा; महिला आयोगाच्या अध्यक्ष वादाच्या भोवऱ्यात
जर विद्यमान मुख्यमंत्री चुकून पुन्हा निवडून आले तर हा राज्याचा पराभव असेल आणि बिहार राज्य हे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर जाईल. ते जातीवादाला चालना कसे काय देतात याचं मला आश्चर्य वाटतं. जो माणूस जातीयवादाला चालना देतो त्या माणसाच्या नेतृत्वात बिहार राज्याच्या विकासाची कल्पना करणे योग्य ठरणार नाही. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाचा जाहीरनामाही प्रसिद्ध केला.
If Nitish Kumar wins elections by mistake, Bihar will be ruined: Chirag Paswan
Read @ANI Story | https://t.co/Bu6NYF8g3U pic.twitter.com/5PYV01YCes
— ANI Digital (@ani_digital) October 21, 2020
बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट असं मोठं ध्येय ठेवून बिहारच्या विकासासाठी हा जाहीरनामा प्रसिद्ध केल्याचं पासवान यांनी म्हटलं आहे. आज पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करतोय. गेल्या अनेक वर्षांपासून बिहार ज्या प्रश्नांशी झुंजतो आहे, त्या प्रश्नांला सोडवण्यासाठी म्हणून बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट हे ध्येय ठेवलं आहे.
हेही वाचा - Bihar Election - Video : तेजस्वी यादवांवर भरसभेत फेकली चप्पल; व्हिडीओ झाला व्हायरल
चिराग पासवान यांची लोकजनशक्ती पार्टी ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील बिहार एनडीएचाच भाग होती. मात्र, सत्तेत राहूनही आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जेडीयूशी असलेले मतभेद पुढे करत लोजपाने स्वंतत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला. मात्र, भाजपाशी असलेलं आपलं सख्य लोजपाने तोडलं नाहीये. केंद्रात एनडीएशी सख्य मात्र राज्यात दुरावा, अशी लोजपाची भुमिका राहीली आहे. लोजपाने जेडीयूविरोधात उमेदवार उभे केले आहेत तर भाजपाविरोधात फक्त पाच ठिकाणी उमेदवार उमेदवार उभे करुन ही खेळीमेळीची स्पर्धा आहे, असं म्हटलं आहे.
243 जागांसाठी बिहार विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तीन टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान हे 28 ऑक्टोबर रोजी होणार आहे तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान 3 आणि 7 नोव्हेंबररोजी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबर रोजी लागणार आहे.