चित्तौडगडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संयोजकाची हत्या; शहरात मोठा पोलीस बंदोबस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chittorgarh RSS Worker Murder

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संयोजकाच्या हत्येनंतर शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झालीय.

चित्तौडगड : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संयोजकाची हत्या; शहरात मोठा पोलीस बंदोबस्त

राजस्थानमधील चित्तौडगडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) संयोजकाच्या हत्येनंतर शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झालीय. मयत रत्ना सोनी (Chittorgarh RSS Worker Murder) एका सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊन परतत असताना दुसऱ्या समाजातील तीन-चार तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात रत्ना सोनी यांचा मृत्यू झालाय.

या घटनेनंतर हिंदू बाजूच्या हजारो लोकांनी रात्रभर शहरातील मुख्य चौकात निदर्शनं केली. परिस्थिती पाहता शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त (Rajasthan Police) तैनात करण्यात आलाय. शहरात कलम 144 लागू करण्यात आलंय. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संयोजक रत्ना सोनी रात्री उशिरा एका कार्यक्रमात सहभागी होऊन परतत होता. यादरम्यान परस्पर भांडणातून इतर समाजाच्या लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला.

Rajasthan Police

Rajasthan Police

हेही वाचा: Singer KK : 'हम रहे या ना रहे कल', KK ची 'ही' गाणी कायम यादगार ठरतील

या हल्ल्यात रत्ना सोनी यांचा मृत्यू झालाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना कच्छी बस्ती परिसरातील आहे. इथं काही तरुणांनी रत्ना सोनी यांच्यावर हल्ला केला, त्यामुळं त्यात ते जखमी झाले. जखमी अवस्थेत उदयपूरच्या रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झालाय. या घटनेनंतर संतप्त हिंदू पक्षाच्या लोकांनी रात्रभर निदर्शनं केली.

Web Title: Chittorgarh Rss Worker Murder Rise Tension In City Section 144 Imposed By Rajasthan Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :RajasthanRSS workerRSS
go to top