
नवी दिल्ली : भारतात लवकरच चौथी लस आपत्कालीन वापरासाठी उपलब्ध होणार आहे. अमेरिकतील मॉडर्ना कंपनीची ही लस असून भारतातील Cipla या फार्मा कंपनीला ही लस आयात करण्याची परवानगी DCGIनं दिली आहे. सुत्रांच्या हवाल्यानं टाइम्सनाऊ न्यूजने हे वृत्त दिलं आहे. (Cipla gets DCGI nod import Moderna covid vaccine use in India)
मॉडर्नाच्या लसीला नुकतेच भारतात वापरासाठी नियामक मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर अमेरिकनं सरकारनं लस वितरणाचा जागतीक प्लॅटफॉर्म 'कोव्हॅक्स' अंतर्गत मॉडर्नाचे काही डोस भारतात पाठवणार असल्याचं कंपनीनं सांगितलं होतं. यासाठी सेन्ट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कन्ट्रोल ऑर्गनायझेशननं (CDSCO) मंजुरी दिली आहे.
Cipla नं आयातीसाठी आणि विक्रीसाठी केला होता अर्ज
मुंबईस्थित फार्मास्युटिकल्स कंपनी असलेल्या Ciplaनं मॉडर्ना कंपनीकडे त्यांच्या लसीच्या आयातीसाठी आणि विक्रीसाठी अर्ज केला होता. तसेच आयातीची परवानगी मिळावी यासाठी सोमवारी Ciplaनं DCGI कडे परवानगीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर Ciplaला मॉडर्नाची लस मागवण्यास DCGIनं मंगळवारी परवानगी दिली, असं सुत्रांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं आहे.
...तरच मॉडर्ना आणि पीफायजरच्या लसींना परवानगी
दरम्यान, काही बातम्यांमधून नुकाताच असा दावाही करण्यात आला होता की, "कमी किंमतीत या लस उपलब्ध करुन देत असतील तरच केंद्रानं मॉडर्ना आणि पीफायजर या कंपन्यांच्याच लस खरेदीला परवानगी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.