

Justice BR Gavai
esakal
सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात क्वचितच अशा घटना घडतात. न्यायमूर्तींमध्ये थेट मतभेद झाल्याचे पाहायला मिळाले. सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठात पर्यावरणाशी निगडित एका महत्त्वाच्या प्रकरणी निकाल देताना दोन न्यायमूर्तींमध्ये थेट मतभेद झाले. न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या ८४ पानी निर्णयाला न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती भुइयां यांनी विरोध केला. विशेष म्हणजे, न्यायमूर्ती भुइयां यांनी तब्बल ९७ पानांचा स्वतंत्र असहमती निर्णय लिहिला आणि सीजेआई गवई यांच्या निर्णयाची कठोर टीका केली. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला.