

Supreme Court bench headed by CJI Surya Kant during the hearing on Christian Army officer Samuel Kamalesan's dismissal case for refusing entry into regimental temple sanctum sanctorum.
esakal
CJI Surya Kant Latest News : भारतीय लष्कराच्या शिस्त आणि धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांना धक्का पोहोचवणाऱ्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. ख्रिश्चन अधिकाऱ्याने रेजिमेंटल धार्मिक कार्यक्रमात मंदिराच्या गर्भगृहात किंवा गुरुद्वारात प्रवेश करण्यास नकार दिल्याने त्याची सेवा समाप्त करण्याच्या लष्कराच्या निर्णयाला न्यायालयाने मान्यता दिली. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने या अधिकाऱ्याला लष्करासाठी पूर्णपणे अयोग्य ठरवले आणि त्याचे वर्तन अनुशासनहीनतेचा सर्वात गंभीर प्रकार आहे असे म्हटले.