मोठी बातमी! CJP च्या दोन मागण्या सरकारकडून मान्य, तिसरीसाठी उद्या पर्यंतची मागितली वेळ, धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार?

CJP Protest Updates: आज सीजेपीच्या शिष्टमंडळाची केंद्र सरकारच्या प्रतिनिधींशी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सीजेपीच्या तीनपैकी दोन मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे.
CJP Protest

CJP-Government Talks: Two Demands Accepted,

esakal

Updated on

NEET Paper Leak Case: सोनम वांगचूक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतरही दिल्लीतील सीजेपीचे आंदोलन सुरूच आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार सीजेपीने व्यक्त केला आहे. दरम्यान, आज सीजेपीच्या शिष्टमंडळाची केंद्र सरकारच्या प्रतिनिधींशी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सीजेपीच्या तीनपैकी दोन मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com