पुलवामात चकमक; दहशतवादी पळाले

पीटीआय
Wednesday, 16 September 2020

मारवाल भागात दोन ते तीन दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला आज सकाळी मिळाली.त्यानुसार लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने तपास मोहिम सुरू केली. चकमकीदरम्यान दहशतवादी पळून गेले.

श्रीनगर - दक्षिण काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात मारवाल भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत मंगळवारी सकाळपासून सुरू असलेली चकमक दुपारी थांबली. दहशतवाद्यांनी घटनास्थळाहून पळ काढला असून, या चकमकीदरम्यान दोन जवान जखमी झाले आहेत. जखमींना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मारवाल भागात दोन ते तीन दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला आज सकाळी मिळाली. त्यानुसार लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने तपास मोहिम सुरू केली. चकमकीदरम्यान दहशतवादी पळून गेले आणि त्यांच्या गोळीबारात दोन जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून ६ लाख रुपये जप्त केले आहेत. अल-बदर दहशतवादी संघटनेला मदत करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. रईस उल हसन आणि मुश्‍ताक अहमद मीर अशी आरोपींची नावे असून ते अवंतीपुरा भागातील रहिवासी होत. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Clashes between security forces & militants in the Marwal area of south Kashmir Pulwama 

Tags
टॉपिकस
Topic Tags: