Congress : अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून अशोक गेहलोतांचा पत्ता कट? 'ही' नावं चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajasthan Political News

राजस्थानात अडीच वर्षांपूर्वी आलेल्या राजकीय संकटाचा दुसरा भाग पुन्हा पाहायला मिळत आहे.

Congress : अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून अशोक गेहलोतांचा पत्ता कट? 'ही' नावं चर्चेत

Rajasthan Political News : राजस्थानात (Rajasthan Congress) अडीच वर्षांपूर्वी आलेल्या राजकीय संकटाचा दुसरा भाग पुन्हा पाहायला मिळत आहे. यावेळी पात्रं बदलली आहेत. सचिन पायलट (Sachin Pilot) यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या शक्यतेवर अशोक गेहलोत (Ashok Gehlot) गटातील आमदारांच्या बंडखोर वृत्तीमुळं संकटाची परिस्थिती निर्माण झालीय. या संपूर्ण घटनाक्रमामुळं अशोक गहलोत यांच्या प्रतिमेलाही धक्का बसला आहे.

गहलोत-पायलट गटात कुरघोडीचं राजकारण

काँग्रेस अध्यक्षपदासाठी (Congress President Election) गहलोत यांची नियुक्ती आणि नव्या मुख्यमंत्रिपदाच्या निवड प्रक्रियेवर साशंकता निर्माण झाली आहे. काँग्रेसचा संघर्ष आता लांबण्याची शक्यता असून गहलोत-पायलट गटामध्ये तळागाळापर्यंत कुरघोडीचं राजकारण आणि संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्यातच आता राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगामुळं मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.

हेही वाचा: Rajasthan : मी ठरवलं तर आमदारांना सोबत आणण्याची जबाबदारी माझी असेल; सचिन पायलटांचा मोठा दावा

गहलोतांच्या कृत्यामुळं गांधी परिवाराचा अपमान

गेहलोत समर्थक आमदारांच्या बंडखोरीनंतर काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून अशोक गेहलोत यांचा पत्ता कट होण्याची चर्चा सुरुय. एवढंच नव्हे तर काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत शशी थरूर, दिग्विजय सिंह (Digvijay Singh), कमलनाथ, मुकुल वासनिक, केसी वेणुगोपाल आणि मल्लिकार्जुन खर्गे यांसारखे पक्षाचे बडे नेते उतरले आहेत. अशोक गेहलोत यांच्या समर्थक आमदारांनी हायकमांडच्या इच्छे विरोधात जाऊन राजीनामे दिल्याने राजस्थानमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. गहलोत यांच्या या कृत्यामुळं गांधी परिवाराचा अपमान आणि विश्वासाला धक्का बसला आहे. त्यामुळंच काँग्रेस वर्किंग कमिटीनं अशोक गेहलोत यांना अध्यक्षपदाच्या शर्यतीतून वगळण्याची शिफारस सोनिया गांधींकडं केली आहे.

हेही वाचा: Gujarat : ओवैसींचं मोदींना थेट चॅलेंज; तीन उमेदवारांची केली घोषणा, हिंदू उमेदवारालाही उतरवलं मैदानात