
बळजबरीने होणारं धर्मांतर रोखण्यासाठी आता मध्य प्रदेश सरकारने पावलं उचलली आहेत. राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी धर्मांतरण करायला लावणाऱ्यांना फाशीची शिक्षा दिली जाईल अशी घोषणा केलीय. मोहन यादव म्हणाले की, धार्मिक स्वातंत्र्य कायद्याच्या माध्यमातून आम्ही तरतूद करत आहे की जे धर्मांतरण करायला लावतील त्यांना आमच्या सरकारकडून फाशीच्या शिक्षेची तरतूद केली जात आहे.