Target Killing | 'ही बाळासाहेबांची शिवसेना! काश्मिरी पंडितांसांठी शक्य ते सर्व काही करणार' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

'ही बाळासाहेबांची शिवसेना! काश्मिरी पंडितांसांठी शक्य ते सर्व काही करणार'

मुंबई : जम्मू आणि काश्मीरमध्ये हिंदू धर्मीयांच्या होत असलेल्या टार्गेट किलिंगबाबत राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांची भूमिका जाहीर केली आहे, काश्मिरी पंडितांसाठी जे जे शक्य आहे ते करू, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. (CM uddhav thackeray said we will do whatever is possible for kashmiri pandits on target killings)

मुख्यमंत्री म्हणाले की, काश्मीर खोऱ्यात काश्मीरी पंडितांचे अक्षरश: शिरकाण सुरू आहे. या क्षणी शिवसेना पक्ष प्रमुख आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी इतकंच वचन देऊ शकतो की, या कठीण काळात काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. महाराष्ट्र आपले कर्तव्य बजावेल अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मांडली आहे.

हेही वाचा: बृजभूषण हे मॅनेज होऊ शकतील अशी व्यक्ती नाही - शरद पवार

काश्मिरी पंडित पुन्हा संकटात सापडला आहे. पंडितांचे हत्याकांड आणि पलायन या बाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठाम उभा राहील. जे जे शक्य आहे ते सर्व करेल अशी भूमिका मुख्यंत्र्यांनीं घेतली आहे. सविस्तर निवेदन येत आहे. दरम्यान अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली होती.

हेही वाचा: संजय राऊत म्हणाले, रात्री १२ वाजता आमित शहांना फोन केला होता अन्...

या दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) टार्गेट किलिंगच्या घटना सुरूच आहेत. काश्मीर खोऱ्यातील हिंदूंना दहशतवादी (Terrorist) सातत्यानं लक्ष्य करत आहेत. काश्मीरमध्ये हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांच्या घटनानंतर गुरुवारी अनेक हिंदू आणि काश्मिरी पंडितांनी (Kashmiri Pandit) काश्मीर सोडले आहे. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एकाच दिवसात काश्मिरातील तब्बल 1 हजार 800 पंडितांसह 3 हजारहून अधिक हिंदूंनी काश्मीर (Kashmir Tagret Killing News) सोडल्याचं वृत्त समोर आलंय. त्यामुळं काश्मिरातील हिंदू वस्त्या पुन्हा ओस पडू लागल्या आहेत.

Web Title: Cm Uddhav Thackeray Said We Will Do Whatever Is Possible For Kashmiri Pandits On Target Killings

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top