योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 मे 2020

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, धमकी देणाऱ्याचा शोध सुरू केला आहे.

लखनौ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, धमकी देणाऱ्याचा शोध सुरू केला आहे.

पोलिस चौकीतच कापला एकाने पोलिसाचा कान...

उत्तर प्रदेश पोलिसांचा 7570000100 हा एक व्हॉट्सऍप नंबर आहे. या नंबरवर 8828453350 या मोबाईलवरून गुरुवारी (ता. 21) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास धमकीचा मेसेज आला. तो मेसेज असा होता की, 'मैं योगी आदित्यनाथ को बम से हमला कर जान से मार दूंगा.' त्यानंतर एका विशिष्ट समुदायाचा उल्लेख करून पुढे योगी त्यांचे कट्टर शत्रु असल्याचे म्हटले होते. हा मेसेज आल्यानंतर पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला; पोलिस हुतात्मा

पोलिस निरीक्षक धीरज कुमार यांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस या प्रकरणाचा शोध घेत आहेत. मेसेज पाठविणाऱया नागरिकाबाबत माहिती मिळाली असून, ती लवकरच जाहिर केली जाईल, असे पोलिस अधिकाऱयांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: up cm yogi adityanath threat to assasinate gomtinagar police case registered