CNG Price Hike: दिल्लीत CNG च्या दरात 2 रुपयांनी वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CNG gas

दिल्लीत CNG च्या दरात 2 रुपयांनी वाढ

नवी दिल्ली : दिल्लीत आजपासून CNG च्या दरात वाढ झाली आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमीटेड या कंपनीने सीएनजी गॅसचे भाव प्रतीकिलो २ रुपयांनी वाढवले आहेत. हे दरवाढ रविवारी सकाळी ६ वाजता म्हणजे आजपासून लागू झाले आहेत. या वाढत्या दरानुसार दिल्लीतील सीएनजीचे भाव ७३.६१ वर जाऊन पोहोचले आहेत.

(CNG Price Hike In Delhi)

इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) ही कंपनी दिल्ली आणि दिल्लीच्या आसपासच्या भागात LPG आणि स्वयंपाकाचा गॅस पुरवते. त्यांनी आता CNG चे भाव प्रतीकिलो २ रुपयांनी वाढवले आहेत या वाढत्या भावानुसार दिल्लीत ७३.६१ रूपये, नोयडामध्ये ७६.१७ आणि गुरूग्राममध्ये ८१.९४ रुपये CNG चे भाव आहेत.

हेही वाचा: आम्ही हिंदुत्व सोडलं नाही असं म्हणण्याची वेळ बाळासाहेबांवर आली नाही - दानवे

दरम्यान इंद्रप्रस्थने देशातील इतर भागातही गॅसचे भाव वाढवले आहेत. त्यानुसार रेवरी मध्ये ८४.०७, कर्नाल आणि कैथलमध्ये ८२.२७ आणि कानपूर, हमीरपूर आणि फतेहपूर मध्ये ८५.४० आणि अजमेर, पाली आणि राजसमांडमध्ये ८३.८८ रुपये एका किलो CNG साठी मोजावे लागणार आहेत.

दरम्यान मागच्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून घरगुती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गॅसचे भाव सारखे वाढत आहेत. आता दिल्लीतील CNG गॅसच्या दरात वाढ झाली असून गेल्या महिन्यात दिल्लीतील ऑटो, टॅक्सी आणि मिनी बस चालकांच्या संघटनांनी सीएनजीच्या दरात वाढ केल्यामुळे संप केला होता.

Web Title: Cng Price Hike In Delhi 2 Rs Per Kg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :delhiCNG Gas
go to top