CNG new price per kg 2026
esakal
गेल्या आठवड्याभरात पेट्रोल डिझेलसह सीएनजीच्या दरातही वाढ करण्यात आलीय. पेट्रोल आणि डिझेल तीन रुपयांनी तर सीएनजीच्या दरात २ रुपयांनी वाढ केली गेली. मात्र आता पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आलीय. दिल्ली एनसीआरमध्ये ही वाढ झाली असून वाहनधारकांना महागाईचा दणका बसला आहे. दिल्ली एनसीआरमध्ये सीएनजी गॅस प्रती किलो एक रुपयाने वाढवण्यात आला आहे.