

Cockroach Janata Party Abhijeet Dipke social media news
esakal
Cockroach Janata Party website : सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी त्यांच्या सोशल मीडिया खात्यांवर कारवाई होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. इंस्टाग्राम पेज हॅक झाल्याचा, वैयक्तिक अकाउंटवरही अनधिकृत प्रवेश झाल्याचा तसेच एक्स (ट्विटर) अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आल्याचा दावा दिपके यांनी केला. तसेच पक्षाच्या खात्यावरही कारवाई झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे सोशल मीडियावरील अभिव्यक्ती स्वातंत्र्य, राजकीय व्यंग आणि ऑनलाईन धमक्या या मुद्द्यांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.