हुतात्मा कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नीची उपजिल्हाधिकारीपदी नेमणूक

वृत्तसंस्था
Wednesday, 22 July 2020

भारत-चीन सीमेवर झालेल्या हिंसक चकमकीत कर्नल संतोष बाबू हुतात्मा झाले होते. संतोषी बाबू यांची पत्नी संतोषी यांची तेलंगणा सरकारने उपजिल्हाधिकारीपदावर नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आज (बुधवार) संतोषी यांना सरकारी नोकरीवर नियुक्तीचे पत्र दिले.

हैदराबाद: भारत-चीन सीमेवर झालेल्या हिंसक चकमकीत कर्नल संतोष बाबू हुतात्मा झाले होते. संतोषी बाबू यांची पत्नी संतोषी यांची तेलंगणा सरकारने उपजिल्हाधिकारीपदावर नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आज (बुधवार) संतोषी यांना सरकारी नोकरीवर नियुक्तीचे पत्र दिले.

चंद्रशेखर राव यांनी अधिकाऱ्यांना फक्त हैदराबाद किंवा आसपासच्या भागातच त्यांनी नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. संतोषी या सध्या 8 वर्षांची मुलगी आणि 3 वर्षाचा मुलगा यांच्यासमवेत दिल्लीत राहत आहेत. दुसरीकडे, हैदराबादमध्ये राहणाऱ्या संतोषच्या आईची इच्छा होती की, मुलाची बदली कधीतरी हैदराबादमध्ये व्हावी. यापूर्वी तेलंगणा सरकारने कर्नल संतोष बाबूच्या कुटूंबाला पाच कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती.

दरम्यान, गालवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यात रक्तरंजित संघर्ष झाला होता. या संघर्षात कर्नल संतोष बाबू यांच्यासह सैन्यातील एकूण 20 जवान हुतात्मा झाले. या चकमकीत कमीतकमी 43 चिनी सैनिक आणि अधिकारीही मारले गेले. कर्नल संतोष बाबू चिनी सैनिकांसोबत बोलणी करत होते. पण चिनी सैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. यामध्ये ते हुतात्मा झाले होते.

Video: 300 किमी वेगाने पळवली दुचाकी अन्...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: col santosh babus widow appointed deputy collector in telangana