मणिपूर: भ्याड दहशतवादी हल्ल्यात कर्नल त्रिपाठींच्या कुटुंबाचा करुण अंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viplav Tripathi

मणिपूर: भ्याड दहशतवादी हल्ल्यात कर्नल त्रिपाठींच्या कुटुंबाचा करुण अंत

म्यानमार बॉर्डरवर आज दहशतवाद्यांनी एक भ्याड हल्ला केला. मणिपूरमध्ये झालेल्या या हल्ल्यात ४६ रायफल्सच्या कमांडिंग ऑफिसर कर्नल विप्लव त्रिपाठी हे शहीद झाले. धक्कादायक म्हणजे कर्नल विजय त्रिपाठी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगा आणि ड्रायव्हर आणि इतर तीन सैनिक देखील या हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडले आहेत. म्यानमार सीमेजवळील मणिपूरमधील चुराचंदपूर येथे हा हल्ला झाला आहे.

हेही वाचा: मुलासोबत पळून गेली...गावकऱ्यांनी केलं मुंडन, काळं फासून काढली धिंड

कर्नल विप्लव त्रिपाठी हे आपल्या कुटुंबासोबत असताना दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला केला. यावेळी त्यांची पत्नी आणि त्यांचा ८ वर्षांच्या लहान मुलाचा देखील मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर आता त्यांच्या कुटुंबासोबतचे फोटो समोर आले असून, मुलगा आणि पत्नीसह संपुर्ण कुटुंबच संपल्याने मोठी हळहळ व्यक्त केली जाते आहे.

हेही वाचा: मोठी बातमी! गडचिरोलीत 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान

दरम्यान, मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी या घटनेचा निशेध केला आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की, 46 AR च्या ताफ्यावरील भ्याड हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. या हल्ल्यात आज चुराचंदपूर येथे कमांडिंग ऑफिसर आणि त्यांच्या कुटुंबासह काही कर्मचारी मारले गेले आहेत. राज्य दल आणि निमलष्करी आधीच अतिरेक्यांचा माग काढण्यासाठी त्यांच्या कामावर आहेत. दोषींना न्याय मिळवून दिला जाईल.

loading image
go to top