
या व्हिडिओच्या माध्यमातून श्याम रंगीला याने इंधन दर वाढीच्या मुद्यावरुन मोदी सरकारवर टीका केली होती.
नवी दिल्ली: देशात सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेल दराववाढीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मीमिक्री करणं कॉमेडियन श्याम रंगीला याला चांगलेच महागात पडणार आहे. याप्रकरणात आता त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. लोकप्रिय कॉमेडियन श्याम रंगीला (Shyam Rangeela) याने श्रीगंगानगर येथील हनुमानगड रोड परिसरातील पेट्रोल पंपाजवळ (Petrol Pump) एक व्हिडिओ शूट केला होता. या व्हिडिओच्या माध्यमातून श्याम रंगीला याने इंधन दरवाढीच्या मुद्यावरुन मोदी सरकारवरची फिरकी घेतली होती.
विशेष म्हणजे त्याने मोदींची नक्कल करत देशात सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीवर भाष्य केले होते. श्याम रंगीलाने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केलेला व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर आता शुक्रवारी त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पेट्रोल पंपाचे मालक सुरेंद्र अग्रवाल यांनी त्याच्याविरोधात ही तक्रार दाखल केली आहे.
देशाचा 'मूड' समजलाय, आता वेगानं पुढे जायचंय - पंतप्रधान मोदी
श्याम रंगीलाने 16 फेब्रुवारीला सोशल प्लॅटफॉर्मवरुन हा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर अल्पावधीत याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. आतापर्यंत हा व्हिडिओ 1 लाख 35 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर 42 हजारहून अधिक लोकांनी या व्हिडिओला पसंती दिली आहे. या व्हिडिओमध्ये मजेशीर अंदाजात श्याम रंगीलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मीमिक्री केली होती.
हे वाचा - गलवानमध्ये प्राणहानी झाल्याची जाहीर कबुली चीनने दिली
या ठिकाणी पेट्रॉलच्या किंमतीने 100 रुपयांचा आकडा पार केला आहे. भाई-बहनो स्वातंत्र्य भारताच्या इतिहासात आतापर्यंत अशी कोणतेच सरकारला जमलं नाही ते आम्ही करुन दाखवलं. पेट्रोलला त्याची योग्य किंमत आम्ही मिळवून दिली, या आशयाचे भाष्य श्याम रंगीला याने संबंधित व्हिडिओमध्ये केले होते. या व्हिडिओमुळे श्याम रंगीला याच्या अडचणी वाढल्या आहेत.
मित्रों आपदा में अवसर तलाशें.
गिलास आधा भरा देखें...
पेट्रोल क़ीमतें भी अच्छी है अगर मेरी नज़र से देखें... तो देखिए और share कीजिए . #PetrolDieselPriceHike #PetrolPrice #PetrolPriceHike #shyamrangeela pic.twitter.com/R5dc1obSno— Shyam Rangeela (@ShyamRangeela) February 16, 2021
ज्या पंपाजवळ श्याम रंगीला याने व्हिडिओ शूट केला त्या पंप मालकाने त्याच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. श्याम रंगीला याने कॉल केला होता. स्वत:ला पत्रकार असल्याचे सांगत त्याने पेट्रोल पंपाजवळ फोटो काढण्याची परवानगी मागितली होती, असा आरोप पेट्रोल पंपाचे मालक सुरेंद्र अग्रवाल यांनी रंगीलावर केला आहे.