बेरोजगारीला कंटाळून पती-पत्नीसह मुलीची आत्महत्या; मुलाने दिली माहिती

committed suicide unemployment
committed suicide unemploymentcommitted suicide unemployment

आग्रा : येथे एका कुटुंबाने आत्महत्या (committed suicide) केली. सुसाईड नोटमध्ये बेरोजगारीची (unemployment) बाब लिहिली आहे. हाउसिंग डेव्हलपमेंट सेक्टर १० मध्ये राहणाऱ्या सोनू शर्मा यांनी बुधवारी (ता. ६) पत्नी गीता शर्मा आणि मुलगी सृष्टी शर्मा यांच्यासह गळफास लावून आत्महत्या केली. धाकट्या मुलाने काकूला सर्वजण खोलीत लटकले असल्याचे सांगितले. यानंतर ही घटना उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू शर्मा (३८) हा पत्नी मिथलेश (३५) मुलगी सृष्टी (९) व मुलगा श्याम (९) यांच्यासह राहत होता. मंगळवारी रात्री कुटुंब एकाच खोलीत झोपले. मुलगा श्याम सकाळी सात वाजताच्या सुमारास खेळायला गेला. शेजारी राहणाऱ्या काकूने श्यामला घरून पीठ आणायला सांगितले.

committed suicide unemployment
स्पाइसजेटचे मालवाहू विमान कोलकात्यात परतले; कालही इमर्जन्सी लँडिंग

श्याम पीठ घेण्यासाठी घरी गेला असता खोलीत वडील, आई आणि बहीण लटकलेले दिसले. त्याने याची माहिती काकूला दिली. मृत सोनूचा मेहुणा विजय कश्यप व इतरांनी घर गाठले असता तिघांचे मृतदेह फासावर लटकलेले दिसले. उपस्थित लोकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.

घटनास्थळावरून अत्यंत भावूकपणे लिहिलेली सुसाईड नोट (Suicide note) सापडली आहे. मृत अनेक दिवसांपासून बेरोजगार होता. तिघांनी आपापसात बोलून आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहे. सुसाईड नोटमधील हस्ताक्षर मृत सोनूच्या हस्ताक्षराशी जुळले आहे, असे एसएसपी प्रभाकर चौधरी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com