'पनवती' शब्दावर आक्षेप, राहुल गांधी अन् खर्गेंविरोधात भाजपची EC मध्ये तक्रार...

Complaint of BJP in Election Commission
Complaint of BJP in Election Commission esakal

नवी दिल्ली: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या, ‘आमचे खेळाडू चांगले विश्वकरंडक जिंकत होते, पण पनवतीने हरविले’, या विधानाला आक्षेप घेत भाजपने बुधवारी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. राजस्थानमधील जालौर येथे जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता राहुल गांधी यांनी ही टीका केली होती. पंतप्रधान मोदी हे स्वत: विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यास हजर होते.

अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव केला होता. राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेनंतर सोशल मीडियावर ‘पनवती’ हा शब्द चांगलाच व्हायरल झाला होता. गांधी यांच्या त्या वक्तव्यावर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. गांधी यांचे विधान अपमानास्पद तसेच लज्जास्पद असल्याचे भाजपने म्हटले आहे.

राहुल गांधी हताश तर झाले आहेतच, पण त्यांचे वक्तव्य म्हणजे त्यांच्या मानसिक अस्थिरतेचे लक्षण आहे,’ अशी टीका भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केली आहे. रवीशंकर प्रसाद यांनीही काँग्रेसवर टीका केली. (Latest Marathi News)

‘‘नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना सोनिया गांधी यांनी त्यांना ‘मौत के सौदागर’ म्हटले होते. त्यानंतर काँग्रेसची काय अवस्था झाली होती, हे सर्वांना माहित आहे. आता राहुल गांधी यांनी पंतप्रधानांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले आहे. गांधी यांनी त्यांचे खरे रूप दाखविले आहे,’’ अशी टीका प्रसाद यांनी केली आहे. दुसरीकडे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश, के. सी. वेणूगोपाल यांनी राहुल यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.

Complaint of BJP in Election Commission
Shiv Sena MLA Disqualification : धिम्यागतीनं सुरु असलेल्या सुनावणीवर नार्वेकरांची नाराजी; म्हणाले, फक्त...

खर्गे यांच्याविरोधातही तक्रार

नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी यांच्या जातीचा समावेश ओबीसी प्रवर्गात करण्यात आला होता,’ या विधानाबद्दल भाजपने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याविरोधात आयोगात तक्रार केली आहे. भाजप नेते राधामोहन अग्रवाल आणि ओम पाठक यांनी ही तक्रार दाखल केली.

मोदी यांच्या घांची समाजाचा समावेश १९९९ साली ओबीसी प्रवर्गात करण्यात आला होता. तर मोदी २००१ साली गुजरातचे मुख्यमंत्री झाले होते. असे असताना खोटी माहिती देऊन खर्गे यांनी लोकांची दिशाभूल केली आहे, असे भाजपने आयोगाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Complaint of BJP in Election Commission
Jammu-Kashmir: राजौरीत दहशतवाद्यांसोबत धुमश्चक्री! 4 जवान शहीद, दोन अधिकाऱ्यांचा समावेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com