
दहशतवाद : संपूर्ण सक्रियता अन् समन्वयाने मोहीम राबवा: शाह
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी सुरक्षा दलांना दहशतवादाचा (Terrorist) नायनाट करण्यासाठी संपूर्ण समन्वय आणि सक्रियतेने मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहेत. दहशतवादाला आळा घालण्यासाठी घुसखोरी पूर्णपणे थांबवणेही आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले आहेत. याशिवाय शहांनी सुरक्षा दलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे शांततापूर्ण आणि समृद्ध जम्मू-काश्मीरचे स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. Amit Shah On Jammu-Kashmir Terrorism Operations )
हेही वाचा: राणांसोबत जे झालं त्यावर गप्प का? फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना सवाल
सुरक्षा दलांनी घुसखोरी शून्य पातळीवर आणली पाहिजे जेणेकरून दहशतवादाचा पूर्णपणे नायनाट करता येईल. जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी हे निर्देश दिल्याचे गृहमंत्रालयाने जारी केकेल्या निवेदनात म्हटले आहे. ही बैठक अशावेळी पार पडली, जेव्हा काही दिवसांपूर्वीच काश्मीरच्या वडगाम जिल्ह्यात राहुल भट्ट नावाच्या काश्मीरी पंडिताची दहशतवाद्यांनी हत्येनंतर झाल्याने या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे.
बैठकीमध्ये दोन वर्षांनी आयोजित करण्यात येणाऱ्या अमरनाथ यात्रेबाबतही सर्व सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा: यंदा पेट्रोल नव्हे तर डिझेलचे दर वाढणार; सरकारी सूत्रांची माहिती
अमरनाथ यात्रा : प्रवाशांचा 5 लाखांचा विमा, पहिल्यांदाच मिळणार RIFD कार्ड
अमरनाथ यात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व यात्रेकरूंना पाच लाखांचा विमा (Insurance) आणि RIFD कार्ड देण्यात येणार आहे, अशी माहिती जम्मू आणि काश्मीरच्या मुख्य सचिवांनी दिली आहे. यावेळी शहांनी यात्रेसंदर्भातील नियम आणि व्यवस्थेबाबत जबाबदार अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली तसेच आवश्यक सूचना दिल्या. अमरनाथ यात्रेसाठी येणाऱ्या यात्रेकरूंना सहज दर्शन मिळावे आणि त्यांना कोणतीही अडचण येऊ नये, ही मोदी सरकारची प्राथमिकता असल्याचे गृहमंत्र्यांनी बैठकीत सांगितले. तसेच यात्रा मार्गावर माहितीच्या प्रसारासाठी मोबाईल टॉवर वाढवणार असल्याचे ते म्हणाले.
याशिवाय अमरनाथ यात्रेकरूंची ये-जा, निवास, वीज, पाणी, दळणवळण आणि आरोग्य यासह सर्व आवश्यक सुविधांसाठी पुरेशी व्यवस्था करण्याच्या सूचनाही शहा यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. प्रवासाच्या मार्गात कोणत्याही प्रकारची माहिती चांगल्या प्रकारे देण्यासाठी मोबाईल टॉवर वाढवणे, तसेच दरड कोसळल्यास मार्ग तातडीने खुला करण्यासाठी मशीन तैनात कराव्यात अशा महत्त्वाच्या सूचनाही शहा यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
Web Title: Conduct Coordinated Counter Terrorism Operations Pro Actively In Jk Says Home Minister Amit Shah
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..