esakal | हल्ल्याच्या 1 वर्षांनंतरही काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते करताहेत पुलवामा हल्ल्यावर सवाल

बोलून बातमी शोधा

Congress and NCP leaders still asks questions on Pulwama attack

देशभरातून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत असून या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात येत आहे. तर काँग्रेस व राष्ट्रवादीकडून मोदी सरकराला यासंदर्भात सवाल करण्यात येत आहेत. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनीही ट्विट कर सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. 

हल्ल्याच्या 1 वर्षांनंतरही काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते करताहेत पुलवामा हल्ल्यावर सवाल
sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मागील वर्षी १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात  ४० जवान हुतात्मा झाले होते. आज या दुर्दैवी हल्ल्याला एक वर्षं पूर्ण झालं. देशभरातून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत असून या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात येत आहे. तर काँग्रेस व राष्ट्रवादीकडून मोदी सरकराला यासंदर्भात सवाल करण्यात येत आहेत. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनीही ट्विट कर सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. 

#PulwamaAttack 'पुलवामा नहीं भूलेंगे...'; हुतात्म्यांना देशभरातून श्रद्धांजली

राहुल गांधी यांनी ट्विट करत पुलवामातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच, तीन सवाल केले आहेत. '१. या हल्ल्याचा सर्वांत जास्त फायदा कोणाला झाला?, २. हल्ल्यानंतर त्याची काय चौकशी करण्यात आली?, ३. भाजप सरकारमधील कोणाला जवानांच्या ढिसाळ सुरक्षा यंत्रणेबद्दल जबाबदार धरावे?' असे सवालच त्यांनी ट्विटमध्ये केले आहेत. 

महाआघाडीतील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनीही या हल्ल्याला १ वर्षांनंतर झाल्यानंतर आज काही सवाल केले आहेत. एएनआयशी बोलताना मलिक म्हणाले, 'पुलवामा हल्ल्यानंतर १ वर्षानंतरही त्या वाहनातील आरडीएक्स कुठून आले याबाबत चौकशी केलेली नाही. ते वाहन जवानांच्या बसजवळ कसे आले याबाबत कोणताही शोध घेतलला नाही, त्या गाडीचा ड्रायव्हर कुठे आहे याबाबत कोणाला माहिती नाही. जनतेला या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत' अशी प्रतिक्रिया मलिक यांनी यावेळी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मागील वर्षी झालेल्या या भ्याड हल्ल्यामुळे देशासह जगाला धक्का बसला होता. भारतीय लष्कराने या हल्ल्याचा बदला बालाकोटवर हल्ला करून घेतला होता. या हल्ल्यात जवानांनी बालाकोटमध्ये जैशे महंमदचे दहशतवादी तळ नष्ट केले होते. उरीवरील भारतीय लष्कराच्या तळांवरील हल्ल्यांनंतर पुलवामात बसवर केलेला हल्ला हा सर्वात मोठा हल्ला होता.