

Congress Organizational Reshuffle
esakal
Congress Secretary Appointments : काँग्रेसने संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी देशभरातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी ८१ सचिवांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या या नियुक्त्यांमध्ये महाराष्ट्रातील चार नेत्यांचा समावेश आहे. यू. बी. वेंकटेश, रेहाना रियाज चिश्ती, एफ. एच. जक्कपनवर आणि योगेंद्र योगी यांच्यावर महाराष्ट्रातील सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.