स्वातंत्र्याची 75 वर्षे : संसदेत कार्यक्रमांचे आयोजन न केल्याने काँग्रेसने भाजपला घेरले

कॉंग्नेस नेत्यांनी तिरंग्या सोबत माजी राष्ट्रपती जवाहरलाल नेहरू यांचा फोटो डीपी ला ठेवला
Congress
Congressesakal

भाजपच्या हर घर तिरंगा अभियानावर आता कॉंग्रेसने चांगलाच समाचार घेतला आहे. नविन संसद भवनात विविध कार्यक्रमाचे आयोजन न केल्याने.कॉंग्रेसने भाजपला घेरल आहे, कॉंग्रेस महासचिव जयराम रमेश म्हणाले स्वातंत्र्याच्या 25व्या, 50व्या आणि 60व्या वर्धापनदिनानिमित्त सेंट्रल हॉलमध्ये विशेष कार्यक्रम आयोजन करण्यात आले नाही.

त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करत भाजप सरकार या प्रसंगाचा उपयोग केवळ ‘सर्वज्ञांचा गौरव’ करण्यासाठी करत आहे. स्वातंत्र्याचा अमृत उत्सवा वरून दोन पक्षात डिपी वरून राजकारण पेटल आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजप नेत्यांनी आपआपल्या सोशल मिडीया वर प्लेटफॉर्म वर 'तिरंगा' हा त्याचा प्रोफाइल पिक्चर बनवला आहे.

Congress
Independence Day: 'हर घर तिरंगा' अभियानाला सुरुवात, १५ ऑगस्टपर्यंत घरोघरी फडकणार 'तिरंगा'

त्याला उत्तर म्हणुन कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी ,कॉंग्रेस महासचिव प्रियांका गांधी ,जयराम रमेश आणि इतर नेत्यांनी तिरंग्या सोबत माजी प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा फोटो डीपी ला ठेवला आहे.पंतप्रधान मोदी यांनी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यांन देशभरातील सर्व नागरिकांच्या घरावर तिरंगा फडकवावा आशी घोषणा केला आहे. या मोहिमेबाबत पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानंतर काही तासांनी राहुल गांधींनी RSS वर हल्ला चढवला की, संघटनेने 52 वर्षात मुख्यालयावर तिरंगा फडकवला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com