नेत्यांच्या नातलगांना तिकट देऊन भाजप, कॉंग्रेसचे 20 उमेदवार रिंगणात; चुरस वाढणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress-BJP

पक्षांच्या उमेदवारांची यादी यापूर्वीच प्रसिद्ध झाली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

नेत्यांच्या नातलगांना तिकट देऊन भाजप, कॉंग्रेसचे 20 उमेदवार रिंगणात

बंगळूर : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होणाऱ्या विधानपरिषदेच्या २५ जागांसाठी १० डिसेंबरला निवडणूक होणार आहे. काँग्रेस, भाजप आणि धजदसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. पक्षांच्या उमेदवारांची यादी यापूर्वीच प्रसिद्ध झाली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. एकमेकांवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या तिन्ही पक्षांनी काही नेत्यांच्या नातलगांना उमेदवारी देऊन घराणेशाहीची परंपरा जपली आहे.

२० जिल्ह्यांतील २५ जागांसाठी १० डिसेंबरला मतदान आणि १४ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत मंगळवारी होती. बुधवारी उमेदवरी अर्जांची छाननी होणार आहे. २६ नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.
शुक्रवारी १० डिसेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. १४ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

हेही वाचा: भाजपच्या पडळकर-देशमुखांना धक्का; तानाजीरावांचा अश्‍वमेध सुटला!

कौटुंबिक राजकारणाचा आरोप असलेल्या धजदने आपली परंपरा कायम ठेवली आहे. एच. डी. रेवण्णा यांचा मुलगा प्रज्वल याला उमेदवारी दिली आहे. भाजपने माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचे बंधू प्रदीप, डी. एच शंकरमूर्ती यांचा मुलगा डी. एस. अरुण यांना उमेदवावारी दिली आहे. कॉंग्रेसने आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी, कोडगूतून माजी मंत्री ए. मंजू यांचे पुत्र मंथरगौड, प्रदेशाध्यक्ष शिवकुमार यांचे नातलग एस. रवी (बंगळूर ग्रामीण), एम. बी. पाटील यांचे बंधू सुनीलगौडा पाटील (विजापूर), आमदार अमरेगौडा बय्यापूर यांचे पुतणे शरणगौडा पाटील (कोप्पळ)आमदार राजशेखर पाटील यांचे बंधू भीमराव पाटील (बिदर) यांना उमेदवारी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने सोमवारी संध्याकाळी १७ उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपप्रमाणेच काँग्रेसनेही २० उमेदवार उभे केले असून, तीन उमेदवारांची नावे मंगळवारी निश्चित केली. मंगळवारी सकाळी धजद उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. ज्यात पक्षाकडून ७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

तिन्ही प्रमुख पक्षांचे उमेदवार असे ः धारवाडमधून प्रदीप शेट्टर (भाजप) व सलीम अहमद (कॉंग्रेस), कारवारमध्ये गणपती उळवेकर (भाजप), भीमण्णा नायक (कॉंग्रेस), बिदरमधून प्रकाश खांड्रे (भाजप), भीमराव पाटील (कॉंग्रेस), विजापूरमध्ये पी. एच. पुजार (भाजप), सुनीलगौडा पाटील (कॉंग्रेस).

हेही वाचा: 'परबांचं रिसॉर्ट केव्हा पाडणार?'; सोमय्यांचा सवाल

loading image
go to top