अधिवेशन बोलावून सुधारणांवर चर्चा करा; काँग्रेसची कृषी कायद्यांबाबत केंद्राकडे मागणी 

congress
congress

नवी दिल्ली - कृषी कायद्यांमध्ये सुधारणेची गरज असली तरी केंद्राच्या कृषी कायदांमध्ये सुधारणा दिसत नाहीत. सरकारने संसदेचे अधिवेशन बोलावून हे कायदे रद्द करावेत आणि कोणत्या सुधारणा अपेक्षित आहेत त्यावर चर्चा करावी, असे आवाहन काँग्रेसने आजच्या ‘भारत बंद’च्या पार्श्वभूमीवर केले. 

हरियानाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा यांनी आज काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन केंद्राच्या कृषी कायद्यांवर टीकास्त्र सोडले. २००७ मध्ये यूपीए सरकारच्या काळात कृषी उत्पादनाशी संबंधित सुधारणा सुचविण्यासाठी नेमलेल्या मुख्यमंच्या कृती गटाचे भूपिंदर हुडा हे अध्यक्ष होते. या गटामध्ये पंजाब, बिहार या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश होता. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या कृतिगटाच्या शिफारशींचा संदर्भ देत हुडा यांनी करार शेतीबाबत (कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग) अनुकूल मत मांडले. याबाबत नियमांसाठी आपल्या अध्यक्षतेखालील कृती गटाने शिफारशी केल्याचा दावा करताना हुडा यांनी हरियानामध्ये २००७ मध्येच करार शेतीचे मूलभूत नियम तयार करण्यात आले होते याकडे लक्ष वेधले. करारनामा एपीएमसीने (बाजार समिती) अधिकृत केलेल्या अधिकाऱ्यासमोर होईल आणि शेतीमालाची खरेदी एमएसपी दरापेक्षा कमी दराने होणार नाही, अशी नियमात तरतूद केली. हे नियम आजही हरियानामध्ये आहेत. केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांमध्ये शेतकऱ्यांना अशा प्रकारे संरक्षण देणारी कोणतीही तरतूद नसल्याचे शरसंधान हुड्डा यांनी केले. 

या तीन कायद्यांसोबत एमएसपीची हमी देणारा चौथा कायदा आणला असता तर या सुधारणांना अर्थ राहिला असता, असा टोलाही त्यांनी लगावला. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दोन व्यवस्था तयार होणार 
नव्या कृषी कायद्यांमुळे बाजार समितीच्या आतील आणि बाहेरील अशा दोन बाजार व्यवस्था अस्तित्वात आल्या आहेत. बाजार समित्यांमध्ये एमसएसपी लागू आहे. परंतु बाहेरच्या व्यवहारांसाठी मात्र ‘एमएसपी’ दर लागू होणार नाही. सुधारीत जीवनावश्यक वस्तू कायद्यांमध्ये तर अमर्याद साठेबाजीची मुभा देण्यात आली आहे. यामुळे मुबलक उत्पादन आल्यानंतर शेतकऱ्यांना स्वस्तात विकावे लागेल आणि कॉर्पोरेट साठेबाज नंतर शेतीमाल साठवून मागणी वाढल्यानंतर दर वाढवतील, असा आरोप हुडा यांनी केला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com