esakal | प्रियांका गांधी जाणार राज्यसभेवर?; पण...

बोलून बातमी शोधा

प्रियांका गांधी जाणार राज्यसभेवर?; पण...

ही आनंदाची बातमी :  डॉ. गोविद सिंह

प्रियांका गांधी जाणार राज्यसभेवर?; पण...
sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मध्य प्रदेशात 5 मार्चपासून राज्यसभेच्या तीन रिक्त जागेसाठी अर्ज भरण्यात येणार आहेत. यामध्ये काँग्रेसला दोन जागा मिळणार आहेत. त्यात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना मध्य प्रदेशमधून राज्यसभेत पाठविले जाणार आहे, याबाबतची मागणी एक डझनहून अधिक मंत्र्यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेसाठी येत्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह आणि ज्योतिरादित्य सिंदिया यांना राज्यसभेत पाठविले जाण्याबाबत चर्चा सुरु आहेत. त्यानंतर आता नेत्यांच्या मागणीनुसार, प्रियांका गांधी यांना मध्य प्रदेशातून राज्यसभेत पाठविले गेले तर दिग्विजय किंवा सिंदिया या दोघांपैकी एकाला राज्यसभेवर घेतले जाऊ शकेल.

भीमा-कोरेगावचा तपास केंद्राकडे देणार नाही : मुख्यमंत्री ठाकरे

मध्य प्रदेशचे उच्च शिक्षणमंत्री जितू पटवारी, नागरी प्रशासनमंत्री जयवर्धन आणि गृहमंत्री बालाबच्चन यांच्यासह राज्य सरकारच्या इतर मंत्र्यांनी प्रियांका गांधी यांना राज्यसभेवर पाठविण्याबाबत मागणी केली आहे. तसेच माजी प्रदेशाध्यक्ष अरुण यादव यांनी राहुल गांधी यांना राष्ट्रीय अध्यक्ष तर प्रियांका गांधी यांना मध्य प्रदेशातून पाठविण्याबाबत शिफारस केली आहे. 

राहुल गांधी बहिणीबाबत घेणार महत्त्वाचा निर्णय; नेत्यांमध्ये रस्सीखेच!

ही आनंदाची बातमी

सामान्य प्रशासनमंत्री डॉ. गोविद सिंह यांनी सांगितले, की राज्यसभेत कोणाला पाठविण्यात यावे, हा निर्णय पक्षाच्या अंतर्गत विषय आहे. वरिष्ठ नेतृत्त्व यावर निर्णय घेईल. प्रियांका गांधी यांना राज्यसभेत पाठविण्याचा हा निर्णय आनंदाची गोष्ट आहे. प्रियांका गांधी पुढे गेल्या तर याचा काँग्रेसला मोठा फायदा होईल.