चिराग पासवान हे भारतीय जनता पक्षाच्या हातातील खेळणे; काँग्रेसची टीका

Chirag-Paswan
Chirag-Paswan

नवी दिल्ली - बिहारमध्ये लोक जनशक्ती पक्षाच्या बाहेर जाण्याने सत्ताधारी ‘एनडीए’मध्ये फाटाफूट झाली असली तरी, चिराग पासवान हे भाजपचे खेळणे असल्याने त्यांच्याशी सहकार्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा पवित्रा काँग्रेसने घेतला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त जनता दल आणि भाजपने प्रत्येकी ११९ जागा लढविण्याची घोषणा केली आहे. तर, अपेक्षित जागा न मिळाल्याने चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने एनडीएला काडीमोड देऊन स्वतंत्रपणे लढण्याचे जाहीर केले आहे. दुसरीकडे, राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि डाव्या पक्षांची महाआघाडी मुख्यमंत्रिपदासाठी तेजस्वी यादव यांचा चेहरा पुढे करून मैदानात उतरली आहे. 

महाआघाडीच्या जागावाटपात काँग्रेसला किमान ८० जागांची अपेक्षा असताना १० जागांची घट सोसून ७० जागांवर तडजोड मान्य करावी लागली आहे. तर, या महाआघाडीत पूर्णपणे वरचष्मा असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने १४४ जागा आपल्याकडे राखल्या आहेत. या व्यतरिक्त १९ जागा मार्क्सवादी लेनिनवादी कम्युनिस्ट पक्षाला तर अनुक्रमे सहा आणि चार जागा भाकप व माकप या पक्षांना सोडण्यात आल्या आहेत. एनडीएमध्ये झालेली फाटाफूट आणि नितीशकुमार यांच्यावर नाराज होऊन चिराग पासवान यांनी मांडलेला लोक जनशक्ती पक्षाचा सवतासुभा याचा फायदा घेण्यासाठी महाआघाडीतील नेत्यांचा प्रयत्न असला तरी काँग्रेसने सावधगिरीचा इशारा दिला आहे.
बिहार निवडणुकीशी संबंधित काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी चिराग पासवान हे भाजपचे बाहुले असल्याचा टोला लगावला. 

कुशासनाचा मुद्दा केंद्रस्थानी
महाआघाडीने सुशासन बाबू नितीशकुमार यांच्या कुशासनाचा मुद्दा 
प्रचारात केंद्रस्थानी ठेवण्याची रणनिती आखली आहे. बेरोजगारी, कोरोनामुळे आरोग्य व्यवस्थेचे उघडे पडलेले पितळ, पूराचे थैमान असताना सरकारची निष्क्रियता यावर सत्ताधारी ‘एनडीए’ला घेरण्याचा महाआघाडीचा प्रयत्न असेल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com