
विदर्भात कंडोमचा वापर वाढला; राष्ट्रीय सर्व्हेतून समोर आली बाब
नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी भारतातील लोक अनेक पद्धतींचा अवलंब करतात. बाजारात अशी अनेक गर्भनिरोधक उपलब्ध आहेत. ज्यामुळे अवांछित गर्भधारणा टाळता येते. भारतात नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी पुरुषांमध्ये कंडोमचा वापर वाढल्याचे नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सेवेच्या सर्वेक्षणाचा नुकताच पाचवा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यातून ही बाब समोर आली आहे. (Condom use increased in Vidarbha)
भारतात अवांछित गर्भधारणेबाबत लोक खूप सावध होत आहेत. त्यासाठी गर्भनिरोधकांचा वापरही वाढू लागला आहे, असे अहवालात म्हटले आहे. जुन्या उपायांऐवजी आता कंडोमसारख्या (Condom) गर्भनिरोधकासाठी आधुनिक पद्धतींचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
हेही वाचा: ताजमहाल मुघलांचा नाही तर आमच्या पूर्वजांचा वारसा; भाजपच्या खासदाराचा दावा
२०१६ च्या चौथ्या अहवालात असे सांगण्यात आले होते की, सुरक्षित लैंगिक आणि गर्भनिरोधकांसाठी (Contraceptives) कंडोम वापरणाऱ्या प्रौढांची संख्या विदर्भात ७.१ टक्के होती. ती आता १४.१ टक्के झाली आहे. त्याचवेळी महाराष्ट्रातील विदर्भाबाबत बोलायचे झाले तर कंडोम वापरणाऱ्यांच्या संख्येत ती ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
नवीन सर्वेक्षणानुसार, मोठ्या शहरांव्यतिरिक्त लहान शहरे आणि खेड्यातील लोक देखील सुरक्षित सेक्ससाठी कंडोम वापरत आहेत. या काळात विदर्भातील महिलांनी गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचे प्रमाण घटले आहे. २०१६ मध्ये हा आकडा २.४ टक्के होता. तो आता १.७ टक्क्यांवर आला आहे.
२०१६ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये गर्भनिरोधकांचा वापर करणाऱ्यांची संख्या ७२ टक्के होती. नवीन अहवालात असे समोर आले आहे की, आता येथील ७८ टक्के प्रौढ अवांछित गर्भधारणा टाळण्यासाठी कंडोमसारख्या (Condom) गर्भनिरोधकांचा (Contraceptives) वापर करीत आहेत.
हेही वाचा: महिला तुरुंगरक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून कैदी गेला पळून; नंतर...
नागपूर शहर महाराष्ट्रात अव्वल
जन्म नियंत्रण वापरण्यात नागपूर शहर महाराष्ट्रात अव्वल आहे. येथील ८४ टक्के लोकांनी गर्भनिरोधकांचा वापर केला. नागपुरात तीन वर्षांत गर्भनिरोधकांसाठी कंडोमचा (Condom) वापर दुपटीने वाढला आहे.
कंडोमचा वापर वाढला
केवळ सुरक्षित सेक्ससाठीच नाही तर विवाहपूर्व सेक्ससाठीही कंडोमचा वापर वाढला आहे. विवाहित लोक जन्म नियंत्रणासाठी अनेक पद्धतींचा अवलंब करतात, तर कंडोम लग्नापूर्वी किंवा नंतर कोणीही वापरू शकतो, असे सर्वेक्षणातून दिसून आल्याचे सेक्सोलॉजिस्ट डॉ. संजय देशपांडे यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले.
Web Title: Condom Use Increased In Vidarbha An Increase Of 3 Percent Maharashtra Nagpur Top
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..