भाजपला अडचणीत आणण्यासाठी काँग्रेसची नवी खेळी; केली या महाअभियानाची सुरुवात

पीटीआय
Thursday, 28 May 2020

कोरोनो महामारीमुळे सर्व आर्थिक उपक्रम ठप्प आहेत. याने मजूर आणि छोटे उद्योग सर्वाधिक प्रभावीत झाले आहे. पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने या सर्वांना चिंतेने ग्रासली आहे. या पार्श्वभूमीवर मजूर आणि सूक्ष्य, लघु आणि मध्यम उद्योगांच्या मदतीसाठी काँग्रेसकडून 'स्पीक अप' हे ऑनलाईन महाअभियान सुरु करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हे अभियान चालवले जाणार आहे.

दिल्ली - कोरोनो महामारीमुळे सर्व आर्थिक उपक्रम ठप्प आहेत. याने मजूर आणि छोटे उद्योग सर्वाधिक प्रभावीत झाले आहे. पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने या सर्वांना चिंतेने ग्रासली आहे. या पार्श्वभूमीवर मजूर आणि सूक्ष्य, लघु आणि मध्यम उद्योगांच्या मदतीसाठी काँग्रेसकडून 'स्पीक अप' हे ऑनलाईन महाअभियान सुरु करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हे अभियान चालवले जाणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

'स्पीक अप' अभियानानुसार पक्षाचे नेते कार्यकर्ते आणि समर्थकांसोबत ऑनलाईन संवाद साधत आहेत. या अभियानात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि अन्य मोठ्या नेत्यांनी सहभाग घेतला आहे. अभियानात 50 लाखांच्यावर कार्यकर्ते आणि समर्थक सहभागी होतील, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. 'स्पीक अप' अभियानात आर्थिक दुरावस्था, प्रवासी मजुरांवरील संकट आणि बेरोजगारी या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. अभियानाद्ववारे भाजप सरकारला घेरण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

पीपीई किटच्या खरेदीत झाला भ्रष्टाचार; भाजप प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा 

काँग्रेसने भाजप समोर दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत. प्रवासी मजुरांना कोणतेही शुल्क न आकारता त्यांच्या घरी पोहोचवणे आणि त्यांना तात्काळ 10 हजार रुपये मदत देणे, तसेच सूक्ष्य, लघु आणि मध्यम उद्योगांना तात्काळ आर्थिक मदत करणे अशा मागण्या काँग्रेसने केल्या आहेत. याशिवाय मनरेगा अंतर्गत रोजगाराचे दिवस वाढवून 200 दिवस करण्याची मागणीही काँग्रसने केली आहे. सुरुवातील मनरेगा अंतर्गत 100 दिवस काम मिळायचे, त्यानंतर ते वाढवून अगोदर 120 आणि आता 150 दिवस करण्यात आले आहे.

धक्कादायक! जम्मू काश्मिरच्या पुलवामामध्ये 20 किलो स्फोटके ठेवलेली कार आढळली

काँग्रेसमधील मोठ्या नेत्यांसह ब्लॉक स्तरपर्यंतचे सर्व नेते या अभियानात सहभागी होणार असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासहित काँग्रेसचे अन्य बडे नेते पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थकांसाठी एक व्हिडीओ संदेश जारी करणार आहेत.

सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात; चीनचे स्पष्टीकरण

दरम्यान, देश सलग चौथी टाळेबंदी अनुभवत असल्याने हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. जवळचे पैसे केव्हाच संपल्याने मजुरांनी मिळेल त्या मार्गाने घराकडे धाव घेतली. अनेकांनी शेकडो किलोमीटरचं अंतर पायी चालून पार केलं आहे. तसेच अनेक उद्योग बंद पडल्याने याचा सर्वाधिक फटका एमएसएमई( सूक्ष्य, लघु आणि मध्यम) उद्योगांना बसला आहे. अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी या उद्योगांना आर्थिक मदत करणे गरजेचं बनलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress initiate speak up mission for migrant workers and msme