narendra modi and rahul gandhi
narendra modi and rahul gandhi

केवळ अल्पसंख्याकच नाही..."; मोदींना पराभूत करण्याच्या रणनीतीवर काँग्रेस नेत्याचं विधान

तिरुवनंतपुरम - २०२४ मध्ये भाजप आणि पंतप्रधान मोदींना पराभूत करण्याच्या रणनीतीत केवळ 'अल्पसंख्याकांचा' समावेश पुरेसा ठरणार नाही, असं विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी यांनी केले आहे. त्यांच्या या विधानावरून काँग्रेसने २०२४ लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचं दिसून येत आहे. (congress leader ak antony news in Marathi)

narendra modi and rahul gandhi
तुनिषा शर्माच्या कुटुंबीयांच्या मदतीला धावले केंद्रीयमंत्री; CM फंडातून मिळवून देणार 25 लाख रुपये

ए. के. अँटनी म्हणाले की, २०२४ मध्ये भाजप आणि पंतप्रधान मोदींना पराभूत करण्याच्या रणनीतीत केवळ 'अल्पसंख्याकांचा' समावेश नसावा, तर हिंदूंनाही सोबत येण्यासाठी आवाहन केले पाहिजे. केरळमधील तिरुवनंतपुरम येथे काँग्रेस स्थापना दिनाच्या कार्यक्रमात ते म्हणाले की, मोदींना हरविण्यासाठी फक्त अल्पसंख्याकांच्या मदतीने भागणार नसून बहुसंख्य हिंदूंची गरज भासणार आहे.

दरम्यान मुसलमान मशिदीत जाऊ शकतात, ख्रिश्चन चर्चमध्ये जाऊ शकतात, पण हिंदू मित्र जेव्हा मंदिरात जातात किंवा टिळा लावतात तेव्हा त्याला 'सॉफ्ट हिंदुत्व' असे म्हणतात. हे असच सुरू राहिलं तर मोदींना पुन्हा सत्तेत येण्यास मदत होईल, असंही अँटनी म्हणाले.

हेही वाचा: क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

'मोदींविरोधात लढण्यासाठी अल्पसंख्याक आणि बहुसंख्य हिंदू अशा दोन्ही समाजांच्या पाठिंब्याची गरज आहे. मोदींविरोधातील लढाईत हिंदूंना एकत्र आणता आले पाहिजे. काँग्रेस सर्वांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, असंही ते म्हणाले.

यावरून भाजपने काँग्रेसवर टीका केली आहे. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी अँटनी यांच्या भाषणाची एक क्लिप ट्विट करत म्हटले की, "काँग्रेससाठी भारतीय भारतीय नाहीत. ते बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक, हिंदू आणि मुस्लिम यांच्यात विभागले गेले आहेत. मात्र ए. के. अँटनी यांच्या वक्तव्याने राहुल गांधी यांच्याकडून मंदिरांना देण्यात येणाऱ्या भेटीचे कारण स्पष्ट होते, असंही मालवीय म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com