तुनिषा शर्माच्या कुटुंबीयांच्या मदतीला धावले केंद्रीयमंत्री; CM फंडातून मिळवून देणार 25 लाख रुपये

tunisha sharma suicide case
tunisha sharma suicide caseGoogle

मुंबई : पालघर जिल्ह्यातील वसई येथे २४ डिसेंबर रोजी एका टीव्ही शोच्या सेटवर अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने आत्महत्या केली होती. या प्रकरणी अभिनेता शिझान याच्यावर तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आली आहे. या घटनेनंतर केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी मृत तुनिषाच्या कुटुंबीयांची भेट घेतली. (tunisha sharma news in Marathi)

tunisha sharma suicide case
Election Commission : निवडणूक आयोग आता RVM आणण्याच्या तयारीत; स्थलांतरीतही करू शकणार मतदान

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, आज मी तुनिषा शर्माच्या आईशी अर्धा तास बोललो. मुलीच्या बाबतीत तिला न्याय हवा आहे. सखोल चौकशीनंतर न्याय दिला जाईल, असे आश्वासन आम्ही दिले आहे. मी उज्ज्वल निकम यांच्याशी बोललो आहे. उज्ज्वल निकम यांना या खटल्यात सरकारी वकील म्हणून आणावे. त्यासाठी मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.

हेही वाचा: क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

tunisha sharma suicide case
Sharad Pawar: शरद पवारांचे PM मोदींना पत्र; काय आहे कारण?

तुनिषाच्या आईने सांगितले की, तनिषा ही घरातील एकमेव कमावती व्यक्ती होती. मी तुनिषाच्या कुटुंबाला पक्षाच्या वतीने आर्थिक मदत करणार आहे. तसेच तुनिषाच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री निधीतून २५ लाख रुपये देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचं आठवले म्हणाले.

तुनिषाच्या आत्महत्येप्रकरणी शिझानला अटक करण्यात आली आहे. तसेच तो तिचा छळ करत होता, असे आरोपही करण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com