पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या

congress leader and punjabi singer sidhu moose wala was shot by unknown people
congress leader and punjabi singer sidhu moose wala was shot by unknown people

काँग्रेस नेते आणि पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची मानसा जिल्ह्यात अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. पंजाब सरकारने एक दिवस आधीच सुरक्षा काढून घेतली होती. पंजाबमधील मानसा जिल्ह्यात अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. (congress leader and punjabi singer sidhu moose wala was shot by unknown people)

त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याच्या मृत्यू झाल्याची घोषणा केली. पंजाब पोलिसांनी सिद्धू मुसेवालासह ४२४ लोकांची सुरक्षा काढून घेतल्याच्या एका दिवसानंतर ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबचे गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांची मानसा गावात काही अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मुसेवाला यांच्या हत्येनंतर पंजाब सरकारवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत कारण एक दिवसापूर्वीच भगवंत मान सरकारने मुसेवालासह ४२४ जणांचे पोलीस संरक्षण काढून घेतले होते.

congress leader and punjabi singer sidhu moose wala was shot by unknown people
पायलटच्या फोनच्या मदतीने सापडलं 'त्या' कोसळलेल्या विमानाचं लोकेशन

सिद्धू मुसेवाला यांनी मानसा येथून काँग्रेसच्या तिकिटावर पंजाब विधानसभेची निवडणूक लढवली आणि आप उमेदवार विजय सिंगला यांनी 63,000 मतांच्या मोठ्या फरकाने त्यांचा पराभव केला. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी नुकतेच विजय सिंगला यांची भ्रष्टाचाराच्या आरोपावरून हकालपट्टी केली होती.

गेल्या महिन्यात सिद्धू मुसेवाला यांनी त्यांच्या 'बली का करा' या गाण्यात आम आदमी पार्टी आणि त्यांच्या समर्थकांना लक्ष्य केल्याने वाद निर्माण झाला होता. गायकाने आपल्या गाण्यात आप समर्थकांना 'गद्दर' (देशद्रोही) म्हटले होते.

congress leader and punjabi singer sidhu moose wala was shot by unknown people
नेपाळमध्ये बेपत्ता झालेलं विमान सापडलं; क्रॅश झाल्याची माहिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com