व्हेंटिलेटरवर 51 दिवस काढणाऱया नेत्याने कोरोनाला हरवले!

congress leader bharat singh solankee was hospitalized 101 days for coronavirus
congress leader bharat singh solankee was hospitalized 101 days for coronavirus

वडोदरा (गुजरात): कोरोनाची लागण झाल्यानंतर 101 दिवसांपैकी 51 दिवस व्हेंटिलेटरवर काढणाऱया नेत्याने कोरोनाला हरवले आहे. भरतसिंग सोलंकी असे त्यांचे नाव असून, काँग्रेसचे ते नेते आहेत.

गुजरातचे माजी अध्यक्ष आणि संपुआ सरकारमधील मंत्री असलेले कॉंग्रेस नेते भरतसिंग सोलंकी यांना आज (गुरुवार) रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. भरतसिंग सोलंकी यांना कोरोनामुळे 101 दिवसांपैकी 51 दिवसाचे व्हेंटिलेटर काढावे लागले. हॉस्पिटलमध्ये राहणारे आशियाईतील ते पहिले रुग्ण ठरले आहेत.

दरम्यान, भरतसिंग सोलंकी यांना 22 जून रोजी ताप आला होता. शिवाय, घशात दुखण्याच्या तक्रारीनंतर वडोदरा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर पुढील उपचारासाठी अहमदाबादच्या सिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे ते तब्बल 51 दिवस व्हेंटिलेटरवर होते. कोरोनामुळे मूत्रपिंडाचा आणि यकृताचा आजार झाला आहे. यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी 101 दिवस लागले आणि आता बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com