Narendra Modi and Jairam Ramesh
Narendra Modi and Jairam Ramesh टिम ई सकाळ

Manipur Election 2022: नरेंद्र मोदी खोटारडे; जयराम रमेश भडकले

मणिपूरमध्ये लसीकरण पूर्णपणे झाले असल्याचा दावा पंतप्रधानांनी केला होता

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मंगळवारला मणिपुर (Manipur) दौऱ्यावर होते. कांग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी मणिपुर मध्ये नरेंद्र मोदी यांच्या रैली नंतर त्यांच्यावर खोटे बोलण्याचा आरोप केलाय. आणि खो़टारडे जगतगुरू आज पण त्यांच्या स्वभावानुसार दिसले, अशा शब्दात त्यांनी नरेंद्र मोदींवर ताशेरे ओढले.जयराम रमेश म्हणाले की महागाई महागाई आणि किमान आधारभूत किंमत या मुद्द्यांवर पंतप्रधान गप्प का राहिले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी मणिपूरमध्ये सांगितले होते की, भारतीय जनता पक्षाच्या डबल इंजिन सरकारने मणिपूरच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत आणि पुढील 25 वर्षे मोठ्या कष्टाने त्याचा विकास केला आहे. एक भक्कम पाया त्यांनी तयार केलाय.

 Narendra Modi and Jairam Ramesh
भाजप कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधींसोबत काढले फोटो, व्हिडिओ व्हायरल

जयराम रमेश म्हणाले, “इंफाळमध्ये (Imphal) खो़टारडे जगतगुरू यांच्या स्वभावाचे दर्शन झाले. मणिपूरमध्ये लसीकरण पूर्णपणे झाले असल्याचा दावा पंतप्रधानांनी केला होता,मात्र देशात लसीकरणच्या बाबतीत मणिपुर राज्य खूपच मागे आहे. लसीकरणासाठी (Vaccination) पात्र असलेल्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ 47.6 टक्के लोकांना लसींचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.”

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com