kamal Nath Switch: कमलनाथ यांच्यासाठी भाजपचे दरवाजे बंद; राजकीय घडामोडीदरम्यान भाजप नेत्याचा दावा; कारणही सांगितलं

Kamal Nath Joining BJP Latest News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचे पुत्र नकुलनाथ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे
Kamal Nath Joining BJP Latest News
Kamal Nath Joining BJP Latest News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) आणि त्यांचे पुत्र नकुलनाथ (Nakul Nath) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यामुळे काँग्रेसच्या गोटात सध्या खळबळ उडाली आहे. या दरम्यान, भाजप नेते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी कमलनाथ यांच्या भाजप प्रवेश होण्याचे वृत्त खोटे असल्याचे म्हटले आहे. १९८४ च्या शीखविरोधी दंगलीतील आरोपी कमलनाथ यांना भाजपमध्ये कुठलेही स्थान नाही, अशी पोस्ट त्यांनी नुकतीच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केली होती.

'आजतक ने दिलेल्या रिपोर्टनुसार, कमलनाथ हे १९८४ च्या शीखविरोधी दंगलीतील आरोपी आहेत. त्याच्याविरोधात अनेक साक्षीदार आहेत. मी आठ दिवस उपोषण केल्यानंतर कमलनाथ यांच्याविरोधात एसआयटी चौकशी सुरू करण्यात आली. रकाब गंज गुरुद्वारा जाळण्यामागची व्यक्ती तीच आहे, जी ९ वे गुरु श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या स्मरणार्थ बांधली गेली होती. कमलनाथ यांना भाजपमध्ये स्थान नाही आणि मी माझ्या पोस्ट स्पष्ट केले आहे असे बग्गा यांनी सांगितलं.

मी वरिष्ठ नेत्यांशी बोललो असून त्यांनी भाजपमध्ये कमलनाथ यांच्यासाठी दरवाजे बंद असल्याचे सांगितले आहे. मी नेहमीच कमलनाथ यांच्या विरोधात आहे आणि त्यांचा मुलगा नकुल यांच्या भाजप प्रवेशाला माझा आक्षेप नाही. बग्गा यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत (कमलनाथ यांचे भाजपमध्ये येणे) कधीही शक्य होणार नाही, मी तुम्हा सर्वांना आश्वासन देतो. असेही बग्गा म्हणाले आहेत

Kamal Nath Joining BJP Latest News
Onion Export Ban Lift: मोदी सरकारचा मोठा निर्णय... कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली

दुसरीकडे मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते देखी कमलनाथ भाजपमध्ये सहभागी होतील असा विचार केला जाऊ शकत नाही. दिग्विजय सिंह म्हणाले की ज्या व्यक्तीच्या राजकीय जीवनाची सुरूवात नेहरू-गांधी परिवारासोबत झाली असेल तो व्यक्ती काँग्रेस सोडून जाईल असा विचार तरी कसा केला जाऊ शकतो.

Kamal Nath Joining BJP Latest News
Yashasvi Jaiswal Ind vs Eng : 6,6,6,6,6,6.... यशस्वी जैस्वाल बनला टीम इंडियाचा 'सिक्सर किंग'! तुफानी फलंदाजी करत केला मोठा विक्रम

तसेच मध्य प्रदेशच्या काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष जीतू पटवारी यांनी देखील कमलनाथ आणि त्यांचे पुत्र नकुलनाथ भाजपमध्ये सहभागी होणार असल्याची बातमी अफा असल्याचे म्हटले आहे. तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी कमलनाथ यांना आपला तिसरा मुलगा मानत होत्या, ते पक्ष सोडणार असल्याचे वृत्त निराधार आहे असेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com