esakal | "केंद्र सरकार जनतेला मूर्ख समजते !'

बोलून बातमी शोधा

P. Chidambaram
"केंद्र सरकार जनतेला मूर्ख समजते !'
sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : देशात ऑक्‍सिजन किंवा लसींचा किंवा रेमडेसिव्हीर इंजेक्‍शनचा तुटवडाच नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केलेले विधान धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी व्यक्त केली. सरकारविरुद्ध लोकांनी बंड करावे, कारण ते तुम्हाला मूर्ख समजत आहे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

पी. चिदंबरम यांनी सलग ट्विटद्वारे टीका केली आहे. ते म्हणाले की, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या विधानांची घृणा येते. उत्तर प्रदेशात लशींचा तुटवडा नाही, असा दावा तेथील मुख्यमंत्री (योगी आदित्यनाथ) करतात. त्यामुळेही मोठा धक्का बसला आहे. डॉक्‍टर खोटे बोलत आहेत का? सर्व रुग्णांचे कुटुंबीय खोटी विधाने करीत आहेत का? विविध माध्यमांमधील दृश्‍यं आणि छायाचित्रे बनावट आहेत का?

- पी. चिदंबरम

शेतकरी आंदोलन, पश्‍चिम बंगालमधील निवडणुकीसाठी घेतलेल्या भव्य प्रचारसभा, कोरोनाच्या जागतिक साथीची हाताळणी, प्रतिबंधक लसीच्या वेगवेगळ्या किमती अशा विविध मुद्द्यांवरून कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपवर वेळोवेळी टीका केली आहे. यात राहुल गांधी आणि चिदंबरम यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी प्रामुख्याने सोशल मीडियाचा वापर करण्यावर कॉंग्रेस नेत्यांनी भर दिला आहे.