"सर्वच मोदी चोर"; राहुल गांधी कोर्टात काय म्हणाले?

Rahul-Gandhi-Pm-Modi
Rahul-Gandhi-Pm-Modi
Summary

अब्रु नुकसानीच्या एका खटल्यात गुरुवारी सूरतमधील एका मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर हजर झालेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी माफी मागण्यास नकार दिला आहे.

नवी दिल्ली- अब्रु नुकसानीच्या एका खटल्यात गुरुवारी सूरतमधील एका मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर हजर झालेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी माफी मागण्यास नकार दिला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान राहुल गांधी यांनी 'मोदी' आडनावाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याप्रकरणी आपली बाजू मांडताना राहुल गांधी म्हणाले की, मी केवळ व्यंग करत होता. तसेच मला याबाबत जास्त काही आठवत नाही. (congress leader rahul gandhi appears before surat court defamation case over modi surname remark)

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी कोर्टात म्हणाले की, 'माझा हेतू कोणत्या समुदायाला लक्ष्य करण्याचा नव्हता. मी केवळ निवडणुकीच्या प्रचारादरम्यान व्यंग करत होतो. मला याबाबत आणखी काही आठवत नाही.' राहुल गांधी यांनी याप्रकरणी माफी मागण्यास नकार दिला असल्याचं त्यांच्या वकीलांना स्पष्ट केलं. याप्रकरणी आता पुढील सुनावणी ११ जुलै रोजी होणार आहे.

Rahul-Gandhi-Pm-Modi
नव्या IT नियमांविरोधात 13 न्यूज संस्थांची हायकोर्टात धाव

गुजरातच्या एका आमदाराने राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. सूरतमधील भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी आयपीसीच्या कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत एप्रिल २०१९ मध्ये राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मागील आठवड्यात सूरतचे मुख्य न्यायिक मॅजिस्ट्रेट ए एन दवे यांनी याप्रकरणी अंतिम वक्तव्य नोंदवण्यासाठी राहुल गांधी यांना २४ जून रोजी कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. राहुल गांधी आज सकाळी सुरतमध्ये पोहोचले होते.

Rahul-Gandhi-Pm-Modi
कोवॅक्सिन दोन वर्षांच्या मुलांवर काम करणार का?

आमदाराने आपल्या तक्रारीत आरोप केला होता की, 'राहुल गांधी यांनी २०१९ च्या निवडणूक प्रचारादरम्यान वादग्रस्त वक्तव्य करुन मोदी समुदायाची मानहानी केली आहे. सर्व चोरांचे एक नाव मोदी कसं असू शकते?' कर्नाटकच्या कोलारमध्ये १३ एप्रिल २०१९ मध्ये राहुल गांधी सभेत म्हटलं होतं की, 'नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी...या सर्वांचे आडनाव मोदी कसं आहे? सर्व चोरांचे एकच अडनाव मोदी कसं आहे?' राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं तेव्हा ते काँग्रेस अध्यक्ष होते. राहुल गांधी याआधी ऑक्टोबर २०१९ मध्ये कोर्टात हजर झाले होते आणि त्यांनी यामध्ये दोषी नसल्याचं म्हटलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com