Accident: दिल्लीतील बड्या काँग्रेस नेत्याच्या पत्नीचे रस्ते अपघातात निधन

दिल्लीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Congress leader Rajesh Lilothia's wife dies in road accident in Delhi
Congress leader Rajesh Lilothia's wife dies in road accident in Delhi
Updated on

दिल्लीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. बड्या काँग्रेस नेत्याच्या पत्नीचे रस्ते अपघातात निधन झाले आहे. (Congress leader Rajesh Lilothia's wife dies in road accident in Delhi)

दिल्ली काँग्रेसचे माजी आमदार राजेश लिलोथिया यांच्या पत्नी मधु लिलोथिया यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. ही घटना सोमवारी काश्मिरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

मधु लिलोथिया या बलेनो कारमधून प्रवास करत असताना त्यांना भरधाव वेगाने येणाऱ्या ब्रेझा कारने धडक दिली. मधु यांना तातडीने ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले मात्र त्यांचे निधन झाले. पोलिसांनी आरोपी कार चालकाला अटक केली आहे. जैनुल असे आरोपीचे नाव असून तो सीलमपूरचा रहिवासी आहे.

Congress leader Rajesh Lilothia's wife dies in road accident in Delhi
Madhya Pradesh Fire : मध्य प्रदेशच्या सरकारी इमारतीला आग; मुख्यमंत्र्यांनी एअरफोर्सकडे मागितली मदत

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना उत्तर दिल्लीच्या कश्मीरी गेट भागात घडली, जिथे एका वेगवान एसयूव्हीने पीडित मधू लिलोथिया यांच्या कारला धडक दिली. घटनेनंतर एसयूव्ही चालकाने घटनास्थळावरून पळ काढला, परंतु नंतर बेदरकारपणे गाडी चालवल्याबद्दल पोलिसांनी त्याला अटक केली.

Congress leader Rajesh Lilothia's wife dies in road accident in Delhi
Maharashtra Sadan: दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील कॅन्टिनच्या चहामध्ये आढळल्या अळ्या!

दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अनिल चौधरी यांनी ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे. "दिल्ली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेश लिलोथिया यांच्या पत्नी श्रीमती मधु लिलोथिया यांचे आज पहाटे रस्ते अपघातात निधन झाले, हे अतिशय दुःखद आहे. अशी भावना अनिल चौधरी यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com