हिंदुत्व पहायचं असेल, तर माझ जळालेलं घर बघा - सलमान खुर्शीद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khurshid

हिंदुत्व पहायचं असेल, तर माझ जळालेलं घर बघा - सलमान खुर्शीद

दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद (Salman Khurshid) हे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. खुर्शीद यांनी लिहीलेल्या 'सनराईज ओव्हर अयोध्या' या पुस्तकावरू हा वाद सूरू आहे. या पुस्तकामध्ये खुर्शीद यांनी हिंदूत्वाची तुलना थेट दहशतवादी संघटनांशी करत हिंतुत्वादाच्या राजकारणावर भाष्य केलं आहे. त्यानंतर अनेकांनी त्यांच्या या पुस्तकावर आक्षेप घेतला असून, हा वाद आता विकोपाला गेल्याचे समजते आहे.

हेही वाचा: अहमदाबादमध्ये उघड्यावर नॉन-व्हेज पदार्थांच्या विक्रीवर बंदी

सलमान खुर्शीद यांनी लिहीलेल्या या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादानंतर त्यांचे उत्तराखंडमधील घर जाळून टाकल्याचे समोर आले आहे. त्यानंतर सलमान खुर्शीद यांनी इंडियाटुडेशी बोलताना आपली बाजू मांडली आहे. यावेळी त्यांनी आपल्या पुस्तकाचा लोकांना भडकावणे हा उद्देश नसल्याचे सांगितले. "जे लोक असहमत आहेत ते कोणत्याही मतभेदाबद्दल बोलले नाही. त्यांचा विरोध एवढ्या टोकाचा होता की, त्यांनी थेट नैनितालमधील माझ्या घराचा दरवाजा पेटवला आहे. यावरून हे सिद्ध होत नाही का की मी म्हणत होतो ते खरे आहे? असा प्रश्न त्यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये उपस्थित केला.

हेही वाचा: समलैंगिक होणार न्यायाधीश; भारतीय न्यायव्यवस्थेत घडला इतिहास

गुलाम नबी आझाद यांच्यासह पक्षातील सहकार्‍यांनीही त्यांचे हे मत अतिशयोक्ती असल्याचे सांगितले. यावर बोलताना ते म्हणाले की, "गुलाम नबी आझाद हे अतिशय आदरणीय व्यक्ती आहेत. मात्र मी त्यांच्याशी असहमत आहे. माझ्या विधानात अतिशयोक्ती असेल तर हे काय आहे? हिंदुत्व काय करू शकते हे पहायचे असेल तर नैनितालमधील माझ्या जळालेल्या घराचे दार बघा."

loading image
go to top