'हिंदू' शब्दाबाबतचा वाद चिघळत असतानाच जारकीहोळींची 'दिलगिरी'; मुख्यमंत्र्यांकडं पत्रातून केली 'ही' मागणी

हिंदू हा शब्द भारतीय नाही, असं काँग्रेस नेते सतीश जारकीहोळींनी म्हटलं होतं.
Congress leader Satish Jarkiholi
Congress leader Satish Jarkiholiesakal
Summary

हिंदू हा शब्द भारतीय नाही, असं काँग्रेस नेते सतीश जारकीहोळींनी म्हटलं होतं.

बेळगाव : कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi) यांनी हिंदू (Hindu) शब्दाबाबत एक विधान केल्यानं राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. काँग्रेस नेत्याच्या या वक्तव्यानंतर वाद अधिकच चिघळत चालला होता. हिंदू हा शब्द भारतीय नाही, असं काँग्रेस नेते सतीश जारकीहोळी यांनी म्हटलं होतं.

ते म्हणाले, हिंदू हा शब्द पर्शियातून (Persia) आला आहे. तसंच हिंदू शब्दाचा अर्थही अत्यंत गलिच्छ असल्याचं सांगितलं. सतीश जारकीहोळी यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी जारकीहोळी यांच्यावर हल्ला चढवायला सुरुवात केली. कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील निपाणी (Nipani) भागात आयोजित कार्यक्रमात काँग्रेस नेते जारकीहोळी सहभागी झाले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावर टीकेची झोड उठल्यानंतर जारकीहोळींनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnataka CM Basavaraj Bommai) यांना पत्र लिहून माफी मागितली आहे.

Congress leader Satish Jarkiholi
Pratapgad : अफजलखानाचं उदात्तीकरण! कबरीला मुंबईतून मोगऱ्याचा हार, बॉम्बस्फोटातील आरोपीनंही केला होता मुक्काम

'हिंदू' शब्दाबाबतचं जारकीहोळींचं वक्तव्य दुर्देवी - बोम्मई

आपल्याला हिंदू विरोधी म्हणत बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणी जारकीहोळींनी आपल्या पत्रात केलीय. ‘हिंदू’ शब्दाबाबतचं जारकीहोळी यांचं वक्तव्य दुर्देवी असल्याचं बोम्मईंनी म्हटलं होतं. “एका समाजातील मतदारांना खूष करण्यासाठी आणि अल्पसंख्यांकांची मतं मिळवण्यासाठी अर्धवट ज्ञानातून काँग्रेस नेत्यानं हे वक्तव्य केलं आहे. हे राष्ट्रविरोधी असून सर्वांनी याचा निषेध केला पाहिजे. राहुल गांधी आणि सिद्धरामय्या यांचं मौन या वक्तव्याला समर्थन दर्शवत आहे का?”, असा सवाल बोम्मई यांनी केला होता.

Congress leader Satish Jarkiholi
Gujarat : दोन दिवसांत काँग्रेसला तिसरा धक्का; आमदार भावेश यांचा राजीनामा, भाजपात जाण्याची शक्यता!

'मी जे बोललो, त्यात काहाही चूक नाही'

दरम्यान, “अनेक पुस्तकांमध्ये ‘हिंदू’ या शब्दाच्या पर्शियन मुळाबाबत उल्लेख आहे”, असा दावा जारकीहोळींनी केला होता. या दाव्याबाबत आपली चूक दाखवून दिल्यास राजीनामा देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली होती. “मी जे बोललो, त्यात काहाही चूक नाही. हा पर्शियन (हिंदू) शब्द कुठून आला याबाबत शेकडो दस्तावेज उपलब्ध आहेत. स्वामी दयानंद प्रकाश यांच्या ‘सत्यार्थ प्रकाश’, डॉ. जीएस पाटील यांच्या ‘बसवा भारत’ पुस्तकात आणि बाळ गंगाधर टिळकांच्या (Bal Gangadhar Tilak) ‘केसरी’ या वृत्तपत्रात याबाबत उल्लेख आला आहे. याबाबत विकीपीडिया आणि संकेतस्थळांवर मोठ्या प्रमाणात लेख उपलब्ध आहेत”, असंही जारकीहोळींनी म्हटलं होतं. त्यानंतर आता आपलं वक्तव्य मागं घेत त्यांनी दिलगिरी व्यक्त केलीय.

Congress leader Satish Jarkiholi
कोणाचे हिंदुत्व शाश्वत...बापुंचे की संघाचे?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com