Delhi Election : काँग्रेसही म्हणते, दिल्लीत केजरीवालच जिंकणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

  • काँग्रेसच्या नेत्यांकडून केजरीवालांवर स्तुतिसुमने
  • तुलसी म्हणतात, 'आप'साठी काँग्रेसचे बलिदान

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा आपचीच सत्ता येणार असल्याचा कौल मतदानोत्तर चाचण्यांनी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी केजरीवाल यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते अधिररंजन चौधरी, के.टी.एस. तुलसी यांनी आज आपची मुक्तकंठाने स्तुती केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधिररंजन चौधरी म्हणाले, की दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा पक्ष समाधानकारक कामगिरी करेल अशी अपेक्षा आम्ही कधीच बाळगली नव्हती. आम्ही पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढलो. एवढे करूनही केजरीवाल जिंकलेच तर राज्याचा अधिक विकास होईल. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने ध्रुवीकरणाचा आधार घेतला, तर केजरीवाल यांनी पूर्णपणे विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली होती. आता केजरीवाल यांचा विजय झाला तर विकासात्मक अजेंड्याचा विजय असेल. काँग्रेसचे बडे नेते के.टी.एस. तुलसी यांनीही आपचे कौतुक केले आहे. केजरीवाल यांच्या विजयाचे भाकीत वर्तविताना ते म्हणाले, की केजरीवाल यांचा विजय व्हावा म्हणून काँग्रेसने मोठे बलिदान दिले आहे.

अभिमानास्पद ! 'ही' व्यक्ती होणार देशातील पहिली मूकबधिर सरपंच

मतदानोत्तर चाचण्यांचा कौल आम्हाला मान्य नाही, दिल्लीमध्ये काँग्रेसला समाधानकारक जागा मिळतील, निकालाच्या दिवशी सर्व काही स्पष्ट होईल. - पी. सी. चाको, नेते, काँग्रेस

मतदान यंत्रात फेरफारीचा आरोप
आम आदमी पक्षाचे खा. संजय सिंह यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सरकारी यंत्रणेकडून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार केला जात असल्याचा आरोप केला आहे. याला दुजोरा देण्यासाठी संजयसिंह यांनी दोन व्हिडिओदेखील शेअर केले आहेत, यामध्ये बाबरपूर येथील विद्या निकेतन शाळेत काही अधिकाऱ्यांना ईव्हीएमसोबत पकडल्याचा दावा त्यांनी केला.

संघनेते पी. परमेश्वरन यांचे निधन; मोदी, शहा यांच्यासह अनेकांची श्रद्धांजली

सिसोदिया रिलॅक्स
दिल्लीतील प्रचाराची रणधुमाळी संपुष्टात आल्यानंतर आपचे नेतेही निवांत झाले आहेत. केजरीवाल यांचे विश्‍वासू आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आज त्यांच्या ट्विटरवर मुलीसोबत खेळतानाचा फोटो शेअर केला आहे. सिसोदिया यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की कुणीतरी मला विचारले की निवडणुकीनंतर तुम्ही काय करत आहात? हे निरागस हास्य ऐकण्याएवढा आणखी दुसरा कोणता चांगला पर्याय असू शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress leader Says AAP likely to win Delhi Assembly elections